Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनी नगरसेवकांसह (Mayor Himgauri Aher-Adke, Deputy Mayor Vilas Shinde) पाहणी केली. यावेळी रस्ते, पूल आणि अन्य नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. (Mayor and Deputy Mayor inspect roads and development works)


आज सकाळी महापौर-उपमहापौरांनी (Mayor Himgauri Aher-Adke, Deputy Mayor Vilas Shinde) आनंदवल्ली, कवडे गार्डन, जेहान सर्कल, बालाजी मंदिर, अंबिका स्वीट ते अमृत गार्डन तसेच पिंपळगाव बहुला परिसरातील विकासकामांची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनी पाहणी केली. या दौऱ्यात रस्त्यांचे खडीकरण त्यासोबतच डांबरीकरण, पुलांचे बांधकाम, भूमिगत वायरिंगचे आणि गटारीचे काम यासह परिसरातील इतर पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली.


पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी कामाचा वेग मंदावल्याचे दिसून आल्याने, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना कामाला गती देण्याच्या सूचना महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केल्या. तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी महापौर आणि उपमहापौरांनी शहरात ठिकठिकाणी सुरु असलेली विकासकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. तसेच कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे,” अशा कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime News : नवरा बायको यांच्यामध्ये होणारे आणि नंतर टोकाले पोहोचलेले वाद क्षणाधार्त आयुष्याची कशी राखरांगोळी करू