Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५ वर्षीय शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला असून, उष्माघातामुळेच हा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्र्यंबक नारायण बेळंबे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जनावरांसाठी चारा कापत होते. दरम्यान, उन्हाचा कडाका वाढलेला असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. शेजारील शेतकऱ्यांनी व नातेवाईकांनी तातडीने त्यांना उचलून पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर नातेवाईकांनी उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. अधिकृत कारण स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून बेळंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



लातूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळेत तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असून उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. यापूर्वी उष्माघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आजच्या घटनेमुळे हा आकडा चारवर पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर आच्छादन ठेवणे, हलका व सैलसर पोशाख वापरणे तसेच गरज नसल्यास उन्हात काम करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः शेतकरी व मजूर वर्गाने कामाचे वेळापत्रक सकाळी किंवा सायंकाळी ठेवावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.



उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे ग्रामीण भागात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून, प्रशासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

 
Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून