Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत १५ पैकी १० महानगरपालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या मेहसाणा, मोरबी आणि नडियादमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची बहीण नयनाबा जडेजा यांना राजकोटमधून काँग्रेसच्या तिकिटावर पराभवाचा सामना करावा लागला आहे.


गुजरातमध्ये 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आज (28 एप्रिल) जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची बहीण नयनाबा जडेजा (Nayanaba Jadeja) यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजकोट महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नयनाबा यांचा भाजपने (BJP) पराभव केला आहे.नयनाबा यांचा पराभव हा या विभागात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.


पराभवानंतर नयनाबा काय म्हणाल्या?


पराभवानंतर नयनाबा जडेजा म्हणाल्या, “जनतेचा कौल मला मान्य आहे. जय-पराजय हा निवडणुकीचा अविभाज्य भाग असतो. मात्र, मी पक्षासाठी आणि जनतेसाठी माझे काम सुरूच ठेवणार आहे. समाजसेवेच्या कार्यातही मी सक्रिय असून ते कार्य पुढेही सुरू राहील. या काळात मला खूप काही शिकायला मिळाले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  (Gujarat Local Body Election Results 2026)


Who is Nayanaba Jadeja: कोण आहेत नयनाबा जडेजा?


नयनाबा जडेजा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची बहीण असून, त्या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत. राजकोट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्या प्रथमच उतरल्या होत्या. नगरसेवकपदासाठी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.


ऐतिहासिक पार्श्वभूमी:


२०२१ च्या निवडणुकीत भाजपने ८,४७० जागांपैकी ६,२३६ जागा जिंकून मोठे यश मिळवले होते. तेव्हा आम आदमी पक्षाने सूरतमध्ये २७ जागा जिंकून 'तिसरी शक्ती' म्हणून प्रवेश केला होता. यावर्षी 'आप' ५,००० जागांवर निवडणूक लढवत असून त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. भाजपने १५ महापालिकांतील १०४४ पैकी ८५६ जागा जिंकल्या. काँग्रेस फक्त ७७ जागा जिंकू शकली. इतरांना १२ जागांवरच समाधान मानावे लागले. तसेच गुजरातच्या ८४ नगरपालिकांतील २०३० पैकी भाजपने १७९१ जागांवर बाजी मारली. काँग्रेसला नगरपालिकांमध्ये ४१४ जागा जिंकता आल्या. इतरांना १४४ जागा जिंकणे जमले.
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र