गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न पडला आहे. मात्र अशातच एक गुड न्यूज समोर आली आहे. सोन्याच्या दरात काही दिवसांपासून घसरण पहायला मिळत आहे त्यामुळे खरेदीदारांसाठी हा काहीसा दिलासा मानला जात आहे.


आज 28 एप्रिलला सोनं-चांदीच्या किंमती या कमी झाल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 60 रुपयांच्या घसरणीसह 151655 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे, तर चांदीचा भाव 1200 रुपयांनी खाली येऊन 240619 रुपये प्रति किलो ग्रॅम वर आला आहे.


महत्त्वाचे म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील सोन्यााचा भाव कमी झाला आहे. सोन्याचा भाव 0.17 टक्क्यांनी खाली येऊन 4685 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करतोय. चांदीमध्येही घसरण पाहायला मिळतेय. सिल्व्हरचा रेट 0.56 टक्क्यांनी खाली येऊन 74.601 वर ट्रेड करतोय.'


मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,53,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोनं हे 1,41,040 रुपये प्रति 10 ग्रॅमवर मिळतंय. तसंच मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,40,890 रुपये आणि 24 कॅरेट सोनं हे 1,53,700 रुपये प्रति 10 ग्रामवर आहे.


दुसरीकडे चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोनं 1,55,250 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1,42,310 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,53,700 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1,40,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकलं जातंय.


चांदीच्या किंमतींविषयी बोलायचं झाल्यास, चैन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीची किंमत जवळपास 2,69,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, यूपी, बिहार सारख्या परिसरांमध्ये चांदीचा भाव जवळपास 2,59,900 रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी