Nashik : मोबाईल बघण्याच्या नादात नको ते होऊन बसलं , चौथ्या मजल्याहून तरुण थेट खाली कोसळला

नाशिक : भद्रकाली (Nashik) येथील शिंगाडा परिसरात मोबाईलच्या गुंगीत असलेल्या सतरा वर्षीय मुलाचा भीषण अपघात झालाय. घराच्या बाल्कनीत मोबाइलवर ‘सर्फिंग’ करताना अचानक तोल गेल्याने हा युवक थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. अरबाज सलीम खान असे मुलाचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.


नेमकं काय घडलं ?
प्राथमिक माहितीनुसार, भद्रकाली (Nashik) येथील शिंगाडा तलाव परिसरातील म्हसोबावाडीत राहणारा अरबाज सलीम खान हा रविवारी (दि. २६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या बाल्कनीत होता. नेहमीप्रमाणे तो मोबाइलवर इंटरनेट सर्फिंग करण्यात मग्न होता. मोबाइलमध्ये तो इतका हरवून गेला, की त्याला आपण बाल्कनीच्या अगदी कडेला बसलो आहोत, याचेही भान राहिले नाही. त्याच नादात अचानक तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. खाली पडताना दुसऱ्या मजल्यावरील एका पत्र्याच्या शेडवर तो जोराने आदळला.


या गंभीर अपघातामुळे (Accident) पत्र्याचा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारी राहणारे धुगेस यादव यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यांना अरबाज रक्ताच्या थारोळ्यात आणि निपचित पडलेला दिसला. यादव आणि इतर रहिवाशांनी अरबाजला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


दरम्यान, घटनेच्या वेळी अरबाज घरात एकटाच होता. त्याचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना अपघात आहे की अन्य संशयास्पद प्रकार याचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या