HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवार १५ मे २०२६ किंवा त्याआधी जाहीर होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर "Class 12th Result 2026 Coming Soon" असा संदेश दिसू लागला आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल लवकरच असा संकेत देणारा संदेश दिसू लागल्याचे मत अनेकजण व्यक्त रत आहेत. पण सूत्रांनी बारावीचा निकाल शुक्रवार १५ मे २०२६ किंवा त्याआधी जाहीर होईल, असे सांगितले. तर काही मीडिया रिपोर्टनुसार बारावीचा निकाला २५ मे च्या आधी जाहीर होईल. अद्याप मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. पण येऊ लागलेल्या रिपोर्टमुळे बारावीची परीक्षा दिलेल्यांची धाकधूक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

बारावीचा निकाल ऑनलाईन तपासण्यासाठीच्या निवडक वेबसाईट : mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , results.digilocker.gov.in , mahahsscboard.in

बारावीचा निकाल बघण्यासाठी आधी ही तयारी करा

विद्यार्थ्यांनी बारावीचा निकाल बघण्यासाठी सोबत हॉल तिकिटातील सर्व माहिती ठेवावी. ऑनलाईन निकाल बघण्यासाठी हॉल तिकिटावरील सीट नंबर अर्थात आसन क्रमांक किंवा बैठक क्रमांक तसेच अर्जावर नोंदवलेले आईचे नाव व्यवस्थित टाईप करावे लागेल. महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल जाहीर करणार आहे. मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला होता. यावर्षीही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या