Nitesh Rane : जहाजबांधणी आणि बंदर विकासात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करणार

बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा विश्वास; धोरणात्मक सुधारणा आणि पायाभूत सुविधांवर भर


मुंबई : जहाजबांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र सागरी क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. या माध्यमातून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासोबतच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी येथे केले.


महाराष्ट्र हे देशातील प्रमुख सागरी केंद्र (मॅरिटाइम हब) म्हणून उदयास येत असल्याचे नमूद करत राणे म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणांशी सुसंगत अशी जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर (रिसायकलिंग) नियमावली राज्याने तयार केली आहे. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी महायुती सरकारने पहिल्या १०० दिवसांतच हे धोरण लागू केले आहे. आम्हाला या क्षेत्रात मागे राहायचे नाही, तर देशाचे नेतृत्व करायचे आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


राज्यातील एकूण ४८ बंदरांपैकी अनेक बंदरे सध्या पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. मात्र, या बंदरांसमोरील तांत्रिक आणि परिचालनात्मक अडचणी दूर करण्यास सरकारचे प्राधान्य असून, याच संदर्भात त्यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढवण बंदर प्रकल्प महाराष्ट्राला जगातील आघाडीच्या बंदरांच्या पंक्तीत नेऊन ठेवेल आणि या बंदरामुळे राज्यातील औद्योगिक वाढ, निर्यात आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जलवाहतूक सक्षम करण्यावर भर


राज्यातील विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून जलवाहतूक विकसित करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. मुंबई वॉटर मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सागरी क्षेत्रात इलेक्ट्रिक बोटी आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे राणे यांनी सांगितले.

देशातील सर्वात मोठे जहाजबांधणी केंद्र महाराष्ट्रात


भारतातले सर्वात मोठे जहाजबांधणी केंद्र (शिपयार्ड) राज्यात उभारण्याचे नियोजन असून त्यासाठी जमीन वाटप आणि धोरणात्मक पाठबळ दिले जात आहे. याशिवाय, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नेदरलँड्स, स्वीडन आणि फिनलंड यांसारख्या देशांशी तांत्रिक सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुंतवणूकस्नेही वातावरण, वेगवान मंजुरी प्रक्रिया आणि केंद्र सरकारशी समन्वय साधून सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून बंदरे, लॉजिस्टिक्स आणि जलवाहतूक यांचे एकात्मिकरण करून महाराष्ट्र एक सक्षम सागरी अर्थव्यवस्था उभी करत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Palghar Crime : पहाटे घराबाहेर पडली, प्रियकराच्या घरी गेली अन्...१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

पालघर : पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू तालुक्यात (Dahanu News) एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली असून, १७ वर्षीय

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत