Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून बोरीवलीतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरीवलीतील भगवती रुग्णालय, कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, मुलुंडमधील एम. टी. रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालया आदी ठिकाणी डायलेसीसची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.


एखाद्या रुग्णाची किडनी खराब झाल्यास त्याच्या शरीरात निर्माण होणारा विषारी धोका टाळण्यासाठी आणि रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डायलेसीस करणे भाग पडत असून याचा खर्च बऱ्याच रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबाला पेलला जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून महापालिकेकडे होत आहे. याची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाने उपनगरातील पाच रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम उपनगरातील तीन आणि पूर्व उपनगरातील दोन अशाप्रकारे पाच उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या रुग्णांना केंद्राच्या योजनेतून मोफत डायलेसीसची सुविधा दिली जाणार आहे तसेच जे योजनेत बसणार नाही त्यांना सवलतीच्या दरामध्ये याठिकाणी डायलेसीसची सुविधा असेल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


बोरीवलीतील महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, भगवती रुग्णालय, मुलुंडमधील म. तु. अगरवाल रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय आदी ५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये या डायलेसीस केंद्राची सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन प्रकल्पांतर्गत प्रत्येकी दहा याप्रमाणे तीस वर्षांसाठी दिली जाणार आहे.


बोरीवली पूर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय


संस्थेचे नाव : ऐपेक्ष किडनी केअर प्रा. लि.


वार्षिक भाडे : ४.२०,००४ रुपये


बोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय


संस्थेचे नाव : मुक्ता किडनी अँड डायलेसिस सेंटर (ओपीसी) प्रा. लि.


वार्षिक भाडे : १२,००,०१२ रुपये


मुलुंड म.तु.अगरवाल रुग्णालय


संस्थेचे नाव : मुक्ता किडनी अँड डायलेसिस सेंटर (ओपीसी) प्रा. लि.


वार्षिक भाडे : ७,२०,००० रुपये


कांदिवली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय


संस्थेचे नाव : ऐपेक्ष किडनी केअर प्रा. लि.


वार्षिक भाडे : ४,२०,००४ रुपये .


घाटकोपर राजावाडी रुग्णालय


संस्थेचे नाव : ऐपेक्ष किडनी केअर प्रा. लि.


वार्षिक भाडे : ४,२०,००४ रुपये

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे