Police : महाराष्ट्र पोलिसांना ग्लोबल बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार

मुंबई : राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच राज्याच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचेही त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हा संदेश दिला. सशस्त्र पोलीस मुख्यालय, कलिना (सांताक्रूझ पूर्व) येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उद्घाटनावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “सरकार हे केवळ आदेश देणारे नसून पाठीशी उभे राहणारे आहे.” पोलिसांसाठी दर्जेदार घरे, सुसज्ज पोलीस स्टेशन, आधुनिक शस्त्रे, वाहने आणि सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


“आपण पोलिसांना नेहमी खाकी वर्दीत पाहतो; मात्र आज ते क्रीडावेशात मैदानात उतरलेले पाहणे अभिमानास्पद आहे. या क्रीडा स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राचे ‘महा ऑलिम्पिक’ असून, महाराष्ट्र पोलीस ‘खिलाडी नंबर वन’ असल्याचे जगाला दाखवण्याची ही मोठी संधी आहे.” “स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू विजेता आहे,” असे सांगत त्यांनी खेळाडूंना प्रेरित केले. यावेळी त्यांनी प्रभावी शब्दांत म्हटले, “हे खेळाचे मैदान आहे; येथे पंच आहेत, पण पंचनामा नाही इथे नोंद होईल ती विक्रमांची!” या विधानाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


महाराष्ट्र पोलीस खेळाडू राज्यापुरते मर्यादित नसून देशपातळीवर आणि जागतिक पोलीस स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी भविष्यात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्येही पोलीस खेळाडूंना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


पोलीस दलाच्या ताणतणावपूर्ण कामाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सण-उत्सव, मोर्चे, कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हा मंत्र जपत ते जनतेचे संरक्षण करतात. अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि पोलीस दलात मैत्रीभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.


राज्य सरकार पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे अधोरेखित करत शिंदे म्हणाले, मुंबई हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच विकासाची खरी गुरुकिल्ली आहे. गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले असून, सुमारे ९० टक्के प्रकरणे ६० दिवसांत निकाली काढली जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.


कलिना येथील सुसज्ज मैदान, पोलीस कॉलनी आणि उत्कृष्ट सुविधा यांचे कौतुक करत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी नसून क्रीडा, पोलीस बँड, संगीत, लेखन आणि कला क्षेत्रातही पुढे असल्याचे सांगत त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.


शेवटी, पोलिसांच्या त्याग आणि सेवाभावाचे स्मरण करून त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “खाकी म्हणजे सेवा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे.” सर्व खेळाडूंना नव्या विक्रमांसाठी शुभेच्छा देत त्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र पोलीस महा ऑलिम्पिक’चे स्वरूप प्राप्त झाल्याचे नमूद केले.


या स्पर्धेमुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी एकत्र येत क्रीडांगणावर आपली क्षमता सिद्ध करत असून, “पोलिसांच्या पाठीशी खंबीर सरकार आणि जागतिक पातळीवर झेप घेणारे महाराष्ट्र पोलीस” असा स्पष्ट संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि