Nitesh Rane PC : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला असून, हिंदुत्वाचा विचार सोडून लाचारी पत्करणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा आमदारकीसाठी धडपडत आहेत, अशा शब्दांत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख थेट ‘उद्धव खान’ असा करत, राणे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर आणि वर्तणुकीवर बोचरी टीका केली.



मंत्रालयात बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हिंदुत्व, महिला आरक्षण आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांसारख्या विषयांवरून विरोधकांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे हा अत्यंत लाचार माणूस आहे. ज्यांनी एकेकाळी विधान परिषदेचा राजीनामा देण्याची भाषा केली होती, तेच आता त्याच पदासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना ते चोरून फोन करत आहेत. उद्या हेच उद्धव ठाकरे सरपंच पदासाठीही उभे राहिले, तरी नवल वाटायला नको”, अशी बोचरी टीका राणे यांनी केली.


विरोधकांना पाकिस्तानातून ‘स्क्रिप्ट’

नितेश राणे म्हणाले, “ज्या खासदारांना 'फतव्यां'च्या जोरावर मते मिळाली आहेत, तेच या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची संपूर्ण ‘स्क्रिप्ट’ पाकिस्तानातून येते,” असे ते म्हणाले. खासदार सुप्रिय सुळे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी, सुळे यांची भूमिका ही नेहमीच ‘लव्ह जिहाद’च्या समर्थनाची राहिली असल्याची टीकाही केली.


‘भगवा कधीच दहशतवादी नसतो’

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “भगवा कधीच दहशतवाद करत नाही, हे आता न्यायालयानेही सिद्ध केले आहे. केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक पेरला होता. काँग्रेस आणि पाकिस्तानची विचारधारा एकच आहे, हेच यातून स्पष्ट होते,” असे त्यांनी नमूद केले.


‘कॉर्पोरेट जिहाद’वर हल्लाबोल

नाशिक आणि पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये धार्मिक कारणांसाठी विश्रांती कक्षाचा गैरवापर होत असल्याचा मुद्द्यावरही नितेश राणे यांनी भाष्य केले. “शाळांप्रमाणेच कॉर्पोरेट कार्यालयांतही हिजाब आणि बुरख्यावर बंदी घातली पाहिजे. जर लेन्सकार्ट सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कपाळाला टिळा लावण्यावर बंदी असू शकते, तर बुरख्याला परवानगी का? हा एक प्रकारचा ‘कॉर्पोरेट जिहाद’ असून याविरोधात हिंदुत्ववादी सरकार ठाम भूमिका घेणार आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक