Maharashtra : महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या अठरा विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची चौदावी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.


या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉडयुल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बैटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.


यामध्ये नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. आठशे कोटींची गुंतवणूक करून पाचशे जणांना रोजगार देणार आहे. अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि.एक हजार कोटींची गुंतवणूक करत आहे.


तर छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. एक हजार कोटींची गुंतवणूक करून एक हजार नवीन रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. पंधराशे कोटींच्या गुंतवणुकीतून तीन हजार लोकांना संधी देणार आहे.


गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. ३,१३५ कोटींची गुंतवणूक करून आठ हजार जणांना रोजगार देणार आहे.अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस चार हजार कोटींच्या गुंतवणुकीसह एक हजार रोजगार निर्माण करेल.


पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. ४२०० कोटींची गुंतवणूक आणि १२ हजर रोजगार निर्मिती करेल. चंद्रपूरमध्ये मिलीयन स्टील प्रा. लि. २५६.०१ कोटींच्या गुंतवणुकीतून ३६० रोजगार देणार आहे.


भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. दहा हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून एक हजार रोजगार उपलब्ध करेल. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. ११,४०० कोटींची गुंतवणूक आणि सात हजार रोजगार निर्माण करेल.तर याच कंपनीचा रायगड/पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्प अकरा हजार कोटींची गुंतवणूक आणि २५०० रोजगार देईल.


नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. १२,७८० कोटींच्या गुंतवणुकीतून ६८२५ जणांना काम देणार आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये १५,४३० कोटींची गुंतवणूक करून ३६०० रोजगार निर्माण करेल. रायगड येथे बालासोर अलॉयज १७,४७९ कोटींची गुंतवणूक आणि 3३२०० रोजगार देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. २७,५१५ कोटींची गुंतवणूक करून चार हजार रोजगार निर्माण करेल. रायगड/पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेक प्रा.लि.चा ग्रीन अमोनिया प्रकल्प ३७,८०० कोटींची गुंतवणूक आणि ४५०० रोजगार घेऊन येत आहे. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. ४० हजार कोटींची भव्य गुंतवणूक आणि २० हजार  रोजगार निर्माण करेल. सर्वात मोठी गुंतवणूक एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये ५६,८५२ कोटींच्या रूपात होणार असून, त्यातून २५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे.


या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.

Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा