KEM Hospital in Parel : परळच्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलणार, तरीही इंग्रजी संशिप्त नाव तेच राहणार

मुंबई : मुंबईतील ब्रिटीशकालिन रस्त्यांची तसेच वास्तूंची नावे बदलण्याचा सपाटा सुुर असतानाच आता केईएम रुग्णालयाचेही नाव बदलण्यात येणार आहे. परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात के. ई. एम. रुग्णालय रुग्णालयाचे नामकरण 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' केले जाणार आहे. मात्र हे नामकरण केले जाणार असले तरी इंग्रजीतील संशिप्त नाव हे के.ई.एम असेच राहणार आहे.


राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांना पत्र लिहून स्वदेशी वारसांच्या सुसंगततेसाठी केईएम रुग्णालयाचे पुनर्नामकरण करण्याची मागणी केली आहे. हे पत्र आता सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. या पत्रामध्ये लोढा यांनी असे म्हटले आहे की, स्वदेशी' या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृध्द स्वदेशी वारसा पुनर्प्रस्थापित आणि गौरव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक संस्थांच्या परकीय नावांचे पुनर्नामकरण करणे आवश्यक आहे. आजमितीपर्यंत अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावांचा वापर करत आहे. जे दास्याच्या काळाची आठवण करून देतात. या वास्तुंना देण्यात येणाऱ्या नावांची जागा ही आपली संस्कृती, मुल्ये आणि प्रेरणादायी इतिहास जपण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. याकरता , किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे पुनर्नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.


त्यामुळे , किंग एडवर्ड मेमोरियल (के. ई. एम. रुग्णालय) रुग्णालयाचे 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' (केईएम) असे पुनर्नामकरण करण्यात यावे,असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.