Marine Technology : आधुनिक सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील सागरी वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) चे बंदरे निरीक्षक व तत्सम अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या फेरीबोट व रो-रो सेवांचा सविस्तर आढावा घेत विविध सुधारणा उपायांवर चर्चा करण्यात आली.


राज्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता फेरीबोट सेवांमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज असल्याचे अधोरेखित करत मंत्री राणे यांनी तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी डिजिटल अॅप विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत ओव्हरलोडिंग रोखणे, सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय परदेशातील प्रगत सागरी वाहतूक प्रणालींचा अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच त्यासाठी ठोस आणि कृतीक्षम प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व आधुनिक सुविधा दिल्याने शासनाच्या महसुलात वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश ही या बैठकीत देण्यात आले.

Comments
Add Comment

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के