BMC News : मुंबई महापालिकेच्या १५३ वर्षांत सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद नाही तरीही सत्ताधारी पक्षाने उचलले पाऊल


मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. महापालिकेचे सोमवारी पार पडलेले अर्थसंकल्पीय चर्चेचे यू ट्युब लाईव्ह करण्यात आले. अशाप्रकारे महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नगरसेवकांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे थेट प्रक्षेपण करताना महापालिकेच्या अधिनियमांचे उल्लंघन झाले असून अधिनियमांमध्ये स्पष्ट तरतूद नसतानाही या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यात आल्याने सर्व माजी नगरसेवकांसह निवृत्त सचिवांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महापालिका सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी झाली होती. त्यानंतर महापौर आणि सभागृहनेत्यांनी सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.



महापालिकेचे पहिले सभागृह ४ सप्टेंबर १८७३मध्ये भरले होते. त्यानंतर मागील १५ वर्षांपासून महापालिकेचे कामकाज लाईव्ह करण्यात यावे अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून केले जात आहे. परंतु आजवर केवळ आणि केवळ अधिनियमांमध्ये तरतूद नसल्याची कारणे देत अशाप्रकारची सुविधा महापालिका सभागृहात देण्यास येत नव्हती.अशाप्रकारे सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे मागील महिन्यात माजी महापौर व नगरसेविका श्रध्दा जाधव आणि नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहाचे कामकाज लाईव्ह करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वार केली. परंतु याबाबतचेही ठरावही सभागृहात मंजूर झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या इतिहासात सभागृहाचे कामकाज लाईव्ह होताना ते नियमांचे उल्लंघन करून सुुरु करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांनी केवळ प्रायोगिक तत्वावर सभागृहाचे कामकाज लाईव्ह करताना अधिनियमातील तरतुदींचा विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळे जोवर अधिनियमांमध्ये तरतूद होत नाही तोवर प्रायोगिक तत्वावरही याचे थेट प्रक्षेपण करता येत नाही. तरीही हा प्रकार घडल्यामुळे प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सर्वच स्तरावर सुरु आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून