Railway News : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल

मुंबई : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या वेळेत बदल : मडगाव जिल्ह्यातील रावणफोंड येथे पुलाच्या बांधकामासाठी कंपोझिट गर्डर टाकण्याकरिता मंगळवार (२१ एप्रिल) ते २४ एप्रिल दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी गाडी क्र. २०६४६ मंगळूरू सेंट्रल - मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस बल्ली स्थानकावर १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. बुधवारी (२२ एप्रिल) गाडी क्र. १२६१९ लो.टि.टर्मिनस- मंगळूरू सेंट्रल एक्सप्रेस मडगाव जंक्शन स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्र. २०९३२ इंदूर - तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस मडगाव जंक्शन स्थानकावर ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गुरूवारी २३ एप्रिल गाडी क्र. १६३३८ एर्नाकुलम जंक्शन- ओखा एक्सप्रेस बल्ली स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल, असे कोकण रेल्वेतर्फे कळवण्यात आले आहे.


सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक २०७०५/२०७०६ सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड ते सीएसएमटी 'वंदे भारत एक्सप्रेस'च्या वेळेत बदल केला आहे. सुधारित वेळा ३ मे २०२६ पासून लागू होतील. ही गाडी सीएसएमटी, दादर, संभाजी नगर, जालना, परभणी, हुजूर साहेब नांदेड येथे थांबेल तसेच हुजूर साहेब नांदेडहून पुन्हा सीएसएमटी असा प्रवास करेल. ठाणे, कल्याण, नाशिक आणि मनमाड येथे वेळेत कोणताही बदल होणार नाही. गाडी क्रमांक १२१४२ पाटलीपुत्र ही गाडी लो.टि.टर्मिनस स्थानकावर दुपारी २:१० ऐवजी २:२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२१८०एम. जी. रामचंद्रन चेन्नई ही गाडी लो. टि. टर्मिनस येथे दुपारी २:२५ ऐवजी २:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ११०१२ धुळे -सीएसएमटी एक्सप्रेस सीएसएमटी येथे २.१५ ऐवजी २.२५ ला पोहोचेल.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या