Crime News : मागील वादातून युवकाचा कोयत्याने खून; दोघे संशयित ताब्यात

नाशिक : अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी नगर परिसरात मागील वादाची कुरापत काढत एका युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल हिरवाळे असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल हिरवाळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.


या हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महालक्ष्मी नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23