Salberdi Movie : मनोरमा उलगडणार 'सालबर्डी'तलं रहस्य

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


सालबर्डी’ हा रहस्यमय चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये मनोरमा प्रधान या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत आहे. तिने प्रेक्षकांवर आपल्या भूमिकेची वेगळीच छाप पाडलेली आहे.


पूजाचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये झाले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटक यामध्ये तिने भाग घेतला होता. नृत्याची तिला आवड होती. वक्तृत्व स्पर्धेत नेहमी तिचा पहिला क्रमांक यायचा. त्यामुळे तिला स्टेजवरील कॉन्फिडन्स प्राप्त झाला.


वडाळ्याच्या एस. आय. डब्ल्यू. एस. या कॉलेजमध्ये तिचे पुढील शिक्षण झाले. खरंतर ते साऊथ इंडियन कॉलेज होते. त्या कॉलेजमध्ये मराठी वाड्मय मंडळ होते. त्यामार्फत तिने काही एकांकिका केल्या. कॉलेजला तिने एकांकिकेमधून काही पारितोषिके मिळवून दिली. श्रावण क्वीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच तिला 'क्षणभर विश्रांती' हा चित्रपट मिळाला होता. क्षणभर विश्रांती चित्रपटाने मला ओळख दिली. ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात मोठी भूमिका दिल्यामुळे ती श्रेयस तळपदेचे आभार मानते.


हा चित्रपट पाहून चंद्रकांत कणसे व अंकुश चौधरी यांनी तिला दगडी चाळ चित्रपटात घेतले. नीळकंठ मास्तर या चित्रपटातील इंदूची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. खरंतर 'अधीर मन झालं' हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं. 'भेटली तू पुन्हा ' या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला.


'जंगली' या हिंदी चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव खूप स्पेशल होता. तिचा सहकलाकार विद्युत होता. त्याच्याकडून प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत तिला शिकायला मिळाली. त्याचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन तिला खूप भावला. या चित्रपटामध्ये तिने महुताची भूमिका केली होती,त्यामुळे तिच्या अवती भोवती नेहमी हत्ती असायचे. एका हत्तिणीशी तिची चांगलीच गट्टी जमली होती. जंगली हा चित्रपट नसून तो देवाने घडवून आणलेला अनुभव आहे असे ती मानते. ते दिवस कायमस्वरूपी तिच्या मनात राहणार आहे. या चित्रपटात काम केल्याने तिला समाधान मिळाले.


तिने तीन रिॲलिटी शो केले, त्यात बूगी वूगी, एकापेक्षा एक, जल्लोष सुवर्ण युगाचा यांचा समावेश होता. जल्लोष सुवर्ण युगाचा हा रिॲलिटी डान्स शो ती जिंकली होती. महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर या सोनी वाहिनीवरील रिॲलिटी शोची ती व धर्मेश परीक्षक होते. दिग्दर्शक रमेश चौधरीने पूजा सावंतचा 'लप्पा छप्पी' हा चित्रपट पहिला होता व त्या वेळी त्यांनी ठरविले होते की स्त्रीप्रधान चित्रपट जर भविष्यात करायचे ठरले तर तिला घ्यायचे. अशा तऱ्हेने तिची 'सालबर्डी 'या चित्रपटासाठी निवड झाली.


या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘या चित्रपटांमध्ये मी पी. आय. मनोरमा प्रधान ही व्यक्तिरेखा साकारत आहे. गावात ज्या घटना घडताहेत, त्याचा तपास करण्यासाठी तिची नियुक्ती सालबर्डी या गावामध्ये केली जाते. ती एक स्टाँग, कणखर अशी पोलीस अधिकारी आहे आणि तिच्या समोर जे रहस्य आले आहे, ते तिला उलगडायचे आहे, त्यामुळे मनोरमा प्रधान ही सशक्त महिला पोलीस अधिकारी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारल्यावर ती म्हणाली, "या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी ह्यांच्यासारखा शांत डोक्याचा दिग्दर्शक मी कधीच नाही पाहिला. शांत यासाठी म्हणेन कारण या दिग्दर्शकाचा या चित्रपटाचा अभ्यास पूर्ण झाला होता. दोन वर्षे ते या चित्रपटावर काम करीत होते. ते जेव्हा सेटवर आले तेव्हा ते अत्यंत सॉर्टेड होते. कुठल्याही प्रकारची चिडचिड नाही, दंगा नाही, निगेटिविटी नाही, त्यामुळे त्यांना माहीत होतं शॉर्ट कसा घ्यायचा आहे. अत्यंत हसत खेळत; परंतु कामावर फोकस असणारा दिग्दर्शक म्हणजे रमेश चौधरी. त्यांच्यासोबत काम करताना मजा आली. वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकारांना एकत्र बांधणे व त्याची फॅमिली तयार करणे हे खूपच भारी पद्धतीने त्यांना जमले आहे."


या चित्रपटातील भूमिकेच्या तयारीविषयी पूजा म्हणाली, “पी. आय. मनोरमा प्रधान हे कॅरेक्टर करण्याआधी मी सर्वप्रथम मानसिक तयारी सुरू केली. पोलीस कशा प्रकारे विचार करत असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल, ते क्राईम सीनवर गेल्यावर कसा विचार करत असतील. त्यांच्या कामाच्या निगेटिव्हिटीवर ते कसे फाईट करत असतील याचा मी खूप जवळून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना भेटले जे पोलीस खात्यात काम करताहेत, त्यांची काम करण्याची पद्धत कशी असायची, ते काम व कुटुंब कसे बॅलन्स करायचे, रिअल लाईफ हिरोंना मी भेटले, जाणून घेतले. व्यायाम तर अनेक वर्षे मी करतेच, पोलीस युनिफॉर्ममध्ये फिट दिसण्यासाठी मी व्यायामात थोडा बदल केला होता.


'सालबर्डी' हा एक रहस्यमय चित्रपट आहे. यामधील कथा सत्यघटनेवर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कळेल की कशा घटना घडतात, त्या घटनांना कशाप्रकारे सामोरे जायला हवे.


प्रत्येक चित्रपट हा पूजासाठी टर्निंग पॉइंट होता. कारण एका चित्रपटाचे काम पाहून तिला पुढील चित्रपट मिळत गेले. त्यामुळे प्रत्येक वित्रपट हा तिच्यासाठी महत्त्वाचा होता आणि तो टर्निंग पॉइंट ठरत गेला.

Comments
Add Comment

Skin Care : महागड्या क्रीम्स विकत घेण्यापेक्षा; तजेलदार त्वचेसाठी करा हे घरगुती उपाय

चमकदार आणि निरोगी त्वचा सगळ्यांनाच हवी असते पण वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे, त्वचा निस्तेज होणे

Swastika Ghosh : कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप

भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची कमाई; चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा ऐतिहासिक पराक्रम पनवेल :

Nashik Crime News : पॉक्सो प्रकरणात मदतीसाठी २० हजारांची लाच; सुरगाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पोलीस ठाण्यातील (Surgana Police Station) एका पोलीस उपनिरीक्षकाला पॉक्सो (POCSO) प्रकरणात मदत

Nashik : पाणलोट विकासाला नवी दिशा ! पीएम कृषि सिंचन योजना ३.० साठी वैज्ञानिक आराखड्याचे सचिव डॉ. जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Nashik : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – पाणलोट विकास घटक ३.० (PM Agricultural Irrigation Scheme 3.0) अंतर्गत राज्यातील प्रत्येक क्षेत्राचा

Dr. Mohan Bhagwat : “संघ आणि राष्ट्रकार्य हेडगेवार यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग” — डॉ. मोहन भागवत

डॉ. हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावर विशेष टपाल आवरणाचे लोकार्पण नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे

Army Chief General Dhiraj Seth : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी 'एक्सट्रीम वेदर ग्रेड' डिझेलचा केला प्रारंभ

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी नवी दिल्ली येथे स्वदेशात विकसित 'एक्सट्रीम वेदर ग्रेड'