Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली, इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी कालावधीसाठी इराणची घोषणा

तेहरान : इस्रायल-लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर होर्मुझचा सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याचे इराणने जाहीर केले आहे. इस्रायल-अमेरिकेने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ ला हवाई हल्ले केले. त्यानंतर युद्धाला तोंड फुटले. तेव्हापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली होती. त्यामुळे या मार्गानं होणारी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक विस्कळीत झाली. इस्रायल-लेबनॉन युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा सागरी मार्ग सुरक्षित वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची घोषणा केली आहे.


इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची घोषणा इराणने केली असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिली. ट्रम्प यांनी ही माहिती त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर दिली. इराणच्या या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील स्वागत केले आहे. त्यांनी ‘थँक यू इराण’, अशी पोस्ट ट्रुथ सोशलवर केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जगातील २० टक्के तेल व्यापार चालतो. याच मार्गाने आखाती देशांमधील तेलाची निर्यात होते. हा मार्ग इराणने रोखून धरल्याने तेल आयात करणाऱ्या देशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. तेल टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. ऊर्जा संकटामुळे अनेक देशांमध्ये आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली.


इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, या काळात सर्व व्यापारी जहाजांना विनाअडथळा आणि सुरक्षित प्रवासाची परवानगी दिली जाईल. ही परवानगी युद्धबंदी संपण्यापर्यंतच असणार आहे, हे देखील इराणने स्पष्ट केले आहे. युद्ध कालावधीत खनिज तेलाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे महागाई वाढली. अनेक देशांसमोर ऊर्जा संकट निर्माण झाले. अखेर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.


इराणच्या 'पोर्ट्स आणि मॅरिटाइम ऑर्गनायझेशन'ने निर्धारित केलेल्या मार्गावरूनच जहाजांना प्रवास करावा लागेल. समुद्री व्यापार प्रभावित होऊ नये आणि जागतिक पुरवठा साखळी सुरळीत राहावी, यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे, अमेरिकेने इराणच्या बंदरांवर कडक नाकेबंदी लागू केली असतानाही इराणने आपली तेल निर्यात सुरूच ठेवली आहे. ‘केपलर’ या मॅरिटाइम ट्रॅकिंग फर्मने दिलेल्या माहितीनुसार इराणचे डीप सी, सोनिया-I आणि डायोना हे तीन मोठे तेल टँकर हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्याने जगाला दिलासा मिळाला आहे. युद्धाच्या ४९ व्या दिवशी इराणने ही घोषणा केली आहे.


नाकेबंदीला बगल


अमेरिकेने सोमवारीच इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध घालण्यासाठी नाकेबंदी केली होती. मात्र, इराणने खार्ग आयलंडवरून भरलेले हे टँकर बुधवारी सुरक्षितपणे बाहेर काढले. १० एप्रिल रोजी 'स्टारला' नावाचा टँकर बाहेर पडल्यानंतरची ही इराणची सर्वात मोठी तेल निर्यात मानली जात आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे २०% ते २५% वाहतूक याच मार्गावरून होते. भारत, चीन आणि जपान यांसारख्या आशियाई देशांसाठी हा मार्ग 'जीवनवाहिनी' मानला जातो. भारताचा बहुतांश तेल पुरवठा या मार्गावरून येतो. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवरील सुरक्षेचा खर्च कमी होईल आणि आगामी काळात भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर किंवा कमी होण्याची शक्यता आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्याने जगाला दिलासा मिळाला आहे. युद्धाच्या ४९ व्या दिवशी इराणने ही घोषणा केली आहे.


युद्धविरामानंतर हजारो कुटुंबांचा परतीचा प्रवास सुरू


अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनान यांच्यात १० दिवसांचा संघर्षविराम जाहीर झाल्यानंतर लेबनानमध्ये सध्या युद्धोत्तर शांतता आणि विस्थापितांच्या घरवापसीचे चित्र पाहायला मिळत आहे. १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झालेल्या या युद्धानंतर, जीव मुठीत धरून पळालेले नागरिक आता पुन्हा आपल्या मातीकडे परतू लागले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच दक्षिण लेबनानकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टायर शहराला जोडणाऱ्या लिटानी नदीवरील महत्त्वपूर्ण 'कासमियेह' पुलापर्यंत ही वाहतूक कोंडी पोहोचली होती. लेबनानी प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना लगेच घरी न परतण्याचे आवाहन केले होते, मात्र घराच्या ओढीने नागरिकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत परतीचा प्रवास सुरू केला. दक्षिण बेरूतच्या 'हारेत हरेक' सारख्या परिसरात पोहोचलेल्या नागरिकांना तिथे घरांच्या जागी केवळ मलब्याचे ढिगारे, तुटलेले रस्ते आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या पाहायला मिळाल्या. मात्र, या विदारक परिस्थितीतही लोकांची जिद्द कायम आहे. ४८ वर्षीय अहमद लहम यांनी आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराच्या ढिगाऱ्यावर उभे राहून हिजबुल्लाचा झेंडा फडकावत भावना व्यक्त केल्या. त्यांनी या युद्धविरामासाठी इराणच्या भूमिकेचे कौतुक केले. सध्या हा युद्धविराम केवळ १० दिवसांसाठी असला, तरी हजारो कुटुंबांनी यामुळे सुटकेचा निश्वास सोडला आहे. पुढील काळात ही शांतता कायम राहते की पुन्हा युद्धाचे ढग दाटतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Indo-Pacific Command : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; 'इंडो-पॅसिफिक कमांड'चे नाव बदलून केले ’पॅसिफिक कमांड’

अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या यूएस इंडो-पॅसिफिक कमांड (यूएसइंडोपाकॉम) चे नाव बदलून पुन्हा यूएस

PM Modi - PM Meloni : G7 मध्ये पुन्हा रंगली ‘मोदी-मेलोनी’ची मैत्री! “आपण इंस्टाग्रामवर सर्वाधिक प्रसिद्ध”, मेलोनींच्या शुभेच्छांनी वेधलं लक्ष

फ्रान्स : फ्रान्समधील एव्हियान येथे पार पडलेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीने अनेक

Donald Trump : वाटाघाटींच्या टेबलावर इराणचा नवा डाव; ट्रम्प यांना समजून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामासाठी सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चेदरम्यान, अमेरिकेचे

Romania Bipin Kumar : बर्फाळ तलावातून चिमुरडीला वाचवणाऱ्या विपिन कुमार यांना 'मानद नागरिकत्व'

रोमानिया: रोमानियातील क्रायोवा शहरात एका भारतीय नागरिकाने माणुसकीचे उत्तम उदाहरण पेश केले आहे. गोठवणाऱ्या

Donald Trump : 'माझ्याशिवाय इस्रायलचे अस्तित्व शक्य नव्हते': डोनाल्ड ट्रम्प यांचा नेतन्याहूंना थेट इशारा!

फ्रान्स : फ्रान्समध्ये आयोजित G7 परिषदेदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी इस्रायलच्या

The Global Superstar Rihanna : अंबानींची खास भेट! रिहानाने कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केले २.२ कोटींचे हिऱ्याचे ब्रेसलेट

जगप्रसिद्ध पॉप स्टार (The global superstar) रिहानाकडे (Rihanna) दागिन्यांचा एक मोठा आणि मौल्यवान खजिना आहे, यात शंकाच नाही. मात्र,