Kamthi ITI : कामठी आयटीआयचे शहीद हेमंत करकरे असे नामकरण

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. रविवारी १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहा वाजता कामठी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


मुंबईतल्या २६/११च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते. त्यांचे बलिदान भारतीय विसरू शकत नाहीत. शहीद करकरे यांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि परमोच्च देशसेवेच्या सन्मानार्थ आयटीआयचे नामकरण करण्यात येत असल्याचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. नामकरणामुळे कामठी येथील आयटीआय संस्थेची ओळख अधिक प्रेरणादायी ठरणार असून, येथील विद्यार्थी करकरे यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन कौशल्य विकासासोबतच राष्ट्रसेवेची भावना जोपासतील, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि