IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत करत दणका दिला. त्यामुळे मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, संघाला आता "काही कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याची" आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज आली आहे. पांड्याचा हा संताप कोणाला उद्देशून आहे हे समजू शकले नसले तरी यावरून एवढं निश्चित झालं आहे की मुंबई संघाच्या अंतर्गत वादाचा परिणाम त्यांच्या खेळावर दिसून येत आहे.


सामन्यानंतर, पराभवाने निराश झालेल्या हार्दिक पांड्याने असे सांगितले की, "आम्हाला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत की नेहमीप्रमाणेच पुढे जायचे आहे, हे पाहावे लागेल. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्यावी लागतील आणि त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला नव्याने विचार करून वैयक्तिकरित्या, एक संघ म्हणून किंवा आमच्या नियोजनात कुठे कमतरता आहे, हे समजून घ्यावे लागेल."



या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने ६० चेंडूंमध्ये शानदार नाबाद ११२ धावा केल्या, परंतु त्याचे शतक विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्याने नमन धीरसोबत ६८ चेंडूंमध्ये १२२ धावांची भागीदारी केली, तर कर्णधार पांड्याने २३ चेंडूंमध्ये ४१ धावा जोडल्या. गोलंदाजीमध्ये, अर्शदीप सिंगने २२ धावांत ३ बळी घेत प्रभावी कामगिरी नोंदवली, तर शशांक सिंगने एक बळी घेतला.





">मुंबई संघाकडून मिळालेलं लक्ष्य पंजाब किंग्सने सहज गाठलं. प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ चेंडूंत १३९ धावांची विजयी भागीदारी रचली आणि संघाला केवळ १६.३ षटकांत विजय मिळवून दिला.



या पराभवानंतर मुंबईचा संघ या हंगामात आपले अंतर्गत मतभेद विसरून पुन्हा एकदा आपल्या गेमवर फोकस करणार का? याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.

Tags
iplmumbai indianshardik pandyaIPL 2026internal dispute
Comments
Add Comment

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर