Thane Illegal Cylinder Storage : ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून ४.५९ लाखांचा सिलिंडर साठा जप्त

शिधावाटप भरारी पथकाचे छापासत्र; एकाला बेड्या, १४० सिलिंडर घेतले ताब्यात


मुंबई : व्यावसायिक वापरासाठीच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडरचा मोठा साठा बाळगणाऱ्या ठाण्यातील ‘डॉमिनोज पिझ्झा’ या नामांकित उपाहारगृहावर शिधावाटप भरारी पथकाने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील या स्टोअरमधून सुमारे ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचा अवैध सिलिंडर साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.



गोपनीय माहितीच्या आधारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा (चर्चगेट) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने या स्टोअरच्या तळघरात छापा टाकला असता, तिथे विविध गॅस कंपन्यांच्या सिलिंडरचा साठा आढळला. यामध्ये कोणतीही सुरक्षिततेची मानके न पाळता हा साठा दडवून ठेवण्यात आला होता. या कारवाईत एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आणि गो गॅस कंपन्यांचे एकूण १४० सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. यात ५५ गॅसने भरलेले, तर ८५ रिकाम्या सिलिंडरचा समावेश आहे. जप्त केलेला एकूण ४ लाख ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाने सीलबंद केला आहे.



जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा


या बेकायदेशीर साठवणुकीप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चितळसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध 'जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५' मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती किंवा नियमबाह्य पद्धतीने गॅसचा वापर करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा साठ्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही पथकाने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आणि हेसन दरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Samsung Galaxy : सॅमसंग गॅलेक्सी एस२६ एफई लीक; नवीन फीचर्स, एक्सिनोस २५०० प्रोसेसर आणि इतर तपशील उघड!

सॅमसंगचा आगामी फॅन एडिशन स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस२६ एफई' (Galaxy S26 FE) लाँच होण्यापूर्वीच इंटरनेटवर त्याचे फीचर्स आणि

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या