IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या संघाने यजमान मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला आणि ते आयपीएल २०२६ गुणतालिकेमध्ये नवव्या क्रमांकावर राहिले. पंजाब किंग्जने या विजयासह ९ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेताना आरसीबी व राजस्थान रॉयल्स यांना मागे ढकलेले. मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे क्विंटन डी कॉकचे वादळी शतक व्यर्थ गेले.


२ बाद १२ धावांवरून मुंबईला २०० पार जाण्याचे स्वप्न क्विंटन डी कॉक आणि नमन धीर यांनी दाखवले. अर्शदीप सिंगने दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेऊन पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. पण, त्यानंतर नमन व क्विंटन यांनी ६८ चेंडूंत १२२ धावा जोडल्या. नमन ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. क्विंटन ६० चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ११२ धावांवर नाबाद राहिला.अर्शदीप सिंहचे चार षटकांमध्ये २२ धावा देत तीन बळी घेतले. या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करत आयपीएलमध्ये १५० बळी घेण्याचा विक्रम केला आहे.


आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून शतक झळकावणारा क्विंटन हा तिसरा ( लोकेश राहुल व संजू सॅमसन) फलंदाज ठरला. नमनची विकेट पडल्यानंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली आणि त्यांना ६ बाद १९५ धावांपर्यंतच पोहोचता आले. त्यांनी २०-२५ धावा कमीच केल्या. प्रियांक आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात २१ धावा चोपल्या आणि ही त्यांची पहिल्या षटकातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी हैदराबादविरुद्ध मागील सामन्यात त्यांनी १८ धावा चोपल्या होत्या. पण, अल्लाह गझनफरने सलग दोन षटकांत पंजाबच्या प्रियांश आर्य ( १५) व कूपर कॉनली ( १७) यांना माघारी पाठवले.


पंजाबने ४५ धावांवर दोन फलंदाज गमावले. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर प्रभसिमरनचा झेल जसप्रीत बुमराहने सोडला. त्याचा फायदा उचलून त्याने २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मुंबईची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण गचाळ झालेले पाहायला मिळाले. पंजाब किंग्स ने १० षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या होत्या. पंजाब किंग्सकडून सर्वाधिक दहा ५०+ धावांचा पराक्रम प्रभसिमरनने नावावर केला. डेव्हिड मिलर ( ९) व शॉन मार्श ( ६) या विक्रमात त्याच्या मागे आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरसोबत त्याने ५५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली.


प्रभसिमरनने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले आणि मुंबईने १३ व्या षटकापर्यंतच पराभव पत्करावा लागला. श्रेयसने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून वानखेडेवरील त्याचा फिफ्टीचा दुष्काळ संपवला. शार्दूल ठाकूरला सलग दोन षटकार खेचून श्रेयसने सामना पंजाबच्या ताटात आणून ठेवला. तो ३५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांवर झेलबाद झाला आणि प्रभसिमरनसह त्याने ६७ चेंडूंत १३९ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. पंजाबने १६.३ षटकांत १९८ धावा करून २१ चेंडू राखत ७ विकेट्सने विजय मिळवला. प्रभसिमनर ३९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला.जसप्रीत बुमराहला आजच्या सामन्यातही बळी मिळाला नाही. चार षटकांमध्ये त्याने ४१ धावा दिल्या, तर दुसरीकडे दीपक चाहरने २.३ षटकांमध्ये ४५ धावा दिल्याने तो महागडा गोलंदाज ठरला. हार्दिक पंड्याने ३ षटकांमध्ये ३९ धावा तर शार्दूल ठाकूरने ३ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या.

Comments
Add Comment

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर