Dr Babasaheb Ambedkar Jayanti : ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीवर अर्पिली कलावंदना!

कोल्हापूरच्या अमित माळकरींनी साकारले बाबासाहेबांचे अनोखे चित्र


कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आणि कष्टकऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्या भाकरीचा प्रश्न मिटवला. याच कृतज्ञतेपोटी कोल्हापूरचे प्रसिद्ध सँड आर्टिस्ट अमित माळकरी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एका वेगळ्या माध्यमाचा वापर करून आपली कला सादर केली आहे. त्यांनी चक्क भाकरीवर बाबासाहेबांचे हुबेहूब चित्र साकारून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.



‘ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीतून अभिवादन’


अमित माळकरी हे त्यांच्या वाळूशिल्पांसाठी (Sand Art) प्रसिद्ध आहेत. मात्र, यावेळी त्यांनी एक आगळावेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. "ज्या महामानवाने कोट्यवधींच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना भाकरी मिळवून दिली, त्याच भाकरीवर त्यांचे रूप साकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे," अशा शब्दांत माळकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



">कलेचा अनोखा आविष्कार

हे चित्र साकारण्यासाठी माळकरी यांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने काम केले आहे. भाकरीच्या खडबडीत पृष्ठभागावर बाबासाहेबांचे चष्मा, कोट आणि त्यांचे तेजस्वी हावभाव जिवंत करणे हे मोठे आव्हान होते. केवळ नैसर्गिक रंगांचा आणि माध्यमांचा वापर करून त्यांनी हे रेखाचित्र पूर्ण केले आहे. हे चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.



अमित माळकरी यांचा परिचय


अमित माळकरी हे केवळ एक कलाकार नसून ते सध्या कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते आपल्या कलेच्या माध्यमातून भाष्य करत असतात. वाळू असो किंवा आताची भाकरी, प्रत्येक माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

Tags
Kolhapur newsDr.Babasaheb Ambedkar Jayantiamit malkariambedkar jayanti
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र