Devendra Fadanvis : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थकारणाला दिशा दिली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन


मुंबई : "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा विचार मांडण्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचण्यातही मोलाची भूमिका बजावली. रिझर्व्ह बँकेची स्थापना असो वा रुपयाच्या क्रयशक्तीचे जागतिक अर्थशास्त्रीय सिद्धांत, बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांनी देशाच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थाने दिशा दिली," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.



">याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एक व्यक्ती समाजात किती मोठे परिवर्तन घडवू शकते, याचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समतेचा मार्ग मोकळा केलाच, पण त्यांचे आर्थिक विचार आजही जागतिक स्तरावर मार्गदर्शक ठरत आहेत. भारतात केंद्रीय बँकेची गरज त्यांनीच अधोरेखित केली होती, ज्यातून पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.


"डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यांकन करण्याच्या आजच्या काळात बाबासाहेबांनी मांडलेले विचार आजही समर्पक आहेत. निर्यातभिमुख अर्थव्यवस्थेत केवळ विनिमय दर महत्त्वाचे नसून रुपयाची क्रयशक्ती किती आहे, हे अधिक महत्त्वाचे असते, हा आर्थिक सिद्धांत बाबासाहेबांनी दशकांपूर्वी मांडला होता," असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. भगवान बुद्धांच्या शिकवणीतील 'अत्त दीप भव' हा संदेश बाबासाहेबांनी कृतीत आणून मानवकल्याणाचा मार्ग प्रशस्त केल्याचेही ते म्हणाले.



मान्यवरांची उपस्थिती


या अभिवादन सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार, संजय शिरसाट, संजय राठोड, छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात अनुयायांची मोठी गर्दी झाली होती.

Tags
dr.babasaheb ambedkarDadar ChaityabhumiDevendra Fadanvisdr babasaheb ambedkar tributedr. babsaheb ambedkarthe Architect of the Indian Constitution
Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा