युद्ध आणि मौल्यवान धातूंचे घसरते भाव

उदय पिंगळे


२८ फेब्रुवारी २०२६ ला सुरू झालेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे पारंपरिकपणे ‘सुरक्षित गुंतवणूक’ (safe haven) म्हणून सोन्याकडे मोठा ओघ अपेक्षित होता. जागतिक इतिहासात, युद्ध म्हणजे सोन्याची मागणीत वाढ असे मानले जाते. त्यानुसार सोन्याचे भाव उत्तरोत्तर वाढत असताना बरोबर एक महिन्यात मार्च २०२६ अखेरीस बाजारात एक आश्चर्यकारक परिस्थिती दिसत आहे, ती म्हणजे दिवसेंदिवस युद्ध अधिक तीव्र होत असतानाही सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. सोन्याच्या भावावर प्रभाव पाडणारे


घटक -


●आंतरराष्ट्रीय भाव : सोन्याचे भाव प्रामुख्याने लंडन मेटल एक्सचेंज आणि न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्सचेंजवर मागणी आणि पुरवठा यावर (COMEX) ठरतात, जिथे ते औंस (ounce) साठी युएस डॉलर (USD) मध्ये मोजले जातात.


●भारतातील किंमत कशी ठरते?
आयात शुल्क (Import Duty): भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. त्यावर लागणारे सीमा शुल्क (Customs Duty) आणि इतर करांचा मोठा वाटा असतो.


●चलन विनिमय दर (Currency Exchange Rate): डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास, भारतात सोने महाग होते.


●स्थानिक मागणी : सण, लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी (ETF, Sovereign Gold Bond) मागणी वाढल्यास भाव वाढतात.
भाव बदलण्याचे मुख्य कारण :


●महागाई (Inflation): महागाई वाढल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, ज्यामुळे दर वाढतात.


●मध्यवर्ती बँका : आरबीआय (RBI) किंवा इतर देशांच्या बँका सोन्याची खरेदी करतात, तेव्हाही भाव वधारतात.


●स्थानिक बाजार : स्थानिक सराफ असोसिएशन किंवा 'बुलीयन असोसिएशन' जागतिक दरांवर आधारित दररोज सकाळी सोन्याचे ताजे दर निश्चित करतात, ज्यामध्ये वस्तू आणि सेवाकरांचा (GST) समावेश होतो.


जर तुम्ही या क्षणी सोन्या-चांदीत फार मोठ्या वाढीची अपेक्षा करत असाल तर सध्याची उपलब्ध आकडेवारी वेगळीच कथा सांगते. सन २०२६ दोन परस्परविरोधी पद्धतीने सोन्याच्या भावात तेजी मंदी दिसून आली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संघर्ष सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सोन्याने अपेक्षेप्रमाणे वाढ दर्शवली आणि अनेक आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले पण ही वाढ टिकली नाही. यानंतर सोन्याच्या घसरणीची मालिका सुरू होऊन मार्चच्या मध्यात सलग सहा सत्रांत झालेली घसरण ही सन २०२४ नंतरची सर्वात खराब कामगिरी होती.


घसरणीचा प्रमाण पाहिले असता जानेवारीच्या अखेरीस सोन्याचा भाव जवळपास $५,६००/- औस होता तेथून सुमारे २७% घसरून $४,०९८/-औस (२३ मार्च) याच काळात चांदीच्या भावातील अस्थिरता पाहिली असता चांदीत ४०% पेक्षा अधिक घसरण झाली ती $१२० वरून $६५–$७० पर्यंत खाली आली.
सन २०२६ मध्ये सोने-चांदी सारखे मौल्यवान धातू अपयशी ठरत आहेत? याची प्रमुख कारणे अशी-


●कच्चा तेलाच्या वाढत्या किमती (Energy Hedge)- या कालावधीत होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा परिणाम म्हणून ब्रेंट क्रूड ४०% पेक्षा जास्त वाढून $११०/barrel च्या वर गेल्याने गुंतवणूकदारांनी सोने सोडून ऊर्जा क्षेत्रात त्यांची गुंतवणूक वळवली आहे.


●फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा कमी- फेडचे Higher for Longer धोरण असून
व्याजदर ३.५%–३.७५% वर कायम ठेवले आहेत. सोने/चांदीत यातील गुंतवणूकीवर व्याज मिळत नाही (non-yielding assets)
या उलट उच्च बाँड उत्पन्नामुळे गुंतवणूकदार अमेरिकन ट्रेझरीकडे वळले आहेत.


●मजबूत अमेरिकन डॉलर (DXY) - डॉलर सुरक्षित गुंतवणूक म्हणून मजबूत झाला असून जागतिक बाजारात सोने महाग झाल्याने सोन्याची मागणी कमी झाल्याने त्याचा किमतींवर दबाव आला आहे.


●असाधारण वाढ - या धातूंच्या किंमती यापूर्वी वाढत होत्याच पण सन २०२५ मध्ये सोने ६५% आणि चांदी १५०% वाढली त्यातील वाढीचा दर हा साधारण नव्हता. त्यामुळे सरकारला सुवर्ण सर्वभोम रोखे मागे घ्यायला लागले. गेल्या वर्षभरात भावांमधे असाधारण वाढ झाल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा वसुली चालू केली. चांदीवर दुहेरी दबाव होता. औद्योगिक मागणी कमी होण्याची भीती वाढली. यामुळे त्यांच्या दारात कुठेतरी स्थिरता येणे आवश्यक होते.
या सर्वांतून, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची शिकवण अशी आहे की, परिस्थिती महत्त्वाची असते. युद्धासोबत व्याजदर बदलतात आणि चलनावरही परिणाम करतात त्यामुळे रोकड सुलभतेची व्याख्या बदलते. कधी कधी रोख पैशाची गरज सुरक्षिततेपेक्षा मोठी ठरते. सोने हे गुंतवणुकीचे एक साधन आहे, कवच नाही. त्यामुळे आता सोने आणि चांदी घ्यावी का? असा प्रश्न पडू शकतो. अनेक वर्षांच्या अनुभवातून एवढ्या मोठ्या प्रमाणात भावात झालेली घसरण येणाऱ्या काळातील मोठ्या तेजीच्या ट्रेंडमधील सुधारणा सुद्धा असू शकते. त्यामुळे सोन्या चांदीतील गुंतवणूक करण्याची रणनीती अशी असावी,


●जर दीर्घकालीन दृष्टिकोनातून तुम्ही नव्याने गुंतवणूक करणार असाल तर एकरकमी गुंतवणूक टाळा. ती हळूहळू अथवा टप्याटप्याने करा.


●जर तुम्ही आधीच गुंतवणूक केली असेल तर सध्या खाली आलेले भाव पाहून घाबरून विक्री करू नका.


●आपल्या गुंतवणूक संचातील ५-१०% भाग सोन्यामध्ये राहील हे पहा.
कारण, सन २०२६ अखेरपर्यंत सोन्याचा भाव $६,०००/औस पेक्षा जास्त असेल, असा जगभरातील प्रमुख बँकर्सचा अंदाज आहे.
थोडक्यात पण महत्वाचे,


● सन २०२६ मध्ये युद्ध असूनही सोन्याचे भाव का घसरत आहेत?
तेलाच्या किमतीत वाढ, उच्च बाँड उत्पन्न आणि सन २०२५ मधील नफा-वसुली यामुळे सोन्याची घसरण होत आहे.


●चांदी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का?
हो, दीर्घकालीन दृष्टीने चांगली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ५जी सुविधा आणि सौर ऊर्जेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. चांदीसाठी $६५–$७५हा खरेदीचा महत्त्वाचा स्तर मानला जातो.


●सन २०२६ मध्ये डॉलरचा सोन्यावर काय परिणाम होऊ शकेल?
या वर्षभरात डॉलर अधिक मजबूत झाला तर सोने महाग होईल, त्यामुळे सोन्याची जागतिक मागणी कमी होऊ शकते आणि किमतींवर मर्यादा येऊ शकते. तरीही नक्की काय होईल आणि त्याचे काय परिमाण होतील यांचे अंदाज बांधता येत नसल्याने मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
मुंबई ग्राहक पंचायत
Email : mgpshikshan@gmail.com

Comments
Add Comment

Crude Oil : जागतिक बाजारात खळबळ! होर्मुज तणावाचा परिणाम; कच्च्या तेलाचे दर १०४ डॉलरच्या पुढे, जागतिक बाजार हादरला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इराण

Gold and silver prices : इराण-अमेरिका तणाव वाढला; सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार

मुंबई : पाकिस्तानच्या इस्लामाबाद (Islamabad) येथे झालेली इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ

टाटा मोटर्स लिमिटेड...

डॉ. सर्वेश सुहास सोमण टाटा मोटर्स (Tata Motors Limited) ही केवळ एक ऑटोमोबाईल कंपनी नसून ती भारताच्या औद्योगिक प्रगतीचे आणि

ग्रॅच्युइटी मिळणार, पण महागाई वाढणार!

महेश देशपांडे आजवर पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरीमध्ये असणाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा फायदा मिळत नव्हता; पण आता अशा

...तर UPI द्वारे पेमेंट होण्यासाठी एक तास लागणार

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यावर लगाम घालण्यासाठी

Pocket Money Feature : गुगल पे कडून ‘पॉकेट मनी’ फीचर लॉन्च; आता मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सुरक्षित डिजिटल व्यवहार शक्य

गुगल पे ने 'पॉकेट मनी' नावाचे एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. ‘पॉकेट मनी’ हे फीचर भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ