मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि सोयीस्कर होतो आहे. अनेक ठिकाणी जलद गतीने जाणे हे मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्यातच आता लवकरच शहरातील सर्वात लांब मेट्रो मार्गिका आकार घेणार आहे, त्यामुळेच कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पासाठी नव्या सल्लागार तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.
शहरातील सर्वाधिक लांब मेट्रो मार्गिका
मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे वैद्यकीय ...
ठाणे - भिवंडी मेट्रोचे काम
मेट्रो ५ आणि कल्याण ते तळोजा १२ या मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो १४ मुळे कल्याण पलीकडच्या शहरातील प्रवाशांना लाभ होणार आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर दरम्यान धावणारी ही मेट्रो वेगाने मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प अहवाल पुनविर्लोनासाठी निविदा मागवल्या आहेत.
लाखो प्रवाशांना होणार फायदा
झपाट्याने विकास होणाऱ्या बदलापूर परिसरातील लाखो प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी सध्या तरी उपनगरीय रेल्वेशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना करत मुंबईत येणाऱ्या नोकरदारांना ही मेट्रो म्हणजे वरदान ठरणार आहे.
मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव ...
असा असेल मार्ग
कांजूर मार्ग ते ज्युवेली गाव, बदलापूर
मार्गाची लांबी : ४३. ६९
प्रस्तावित स्थानकांची संख्या : २४ ( कांजूर ,मार्ग येथे एक भूमिगत स्थानक )
मेट्रोची रचना : सहा डब्यांची गाडी
कमाल वेग : ९० किमी प्रति तास
वाहतुकीचा सरासरी वेग : ५५ किमी प्रतितास