पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू; पुणे महापालिका आयुक्तांचा दणका; ४ अधिकारी निलंबित, मुख्य अभियंत्याला नोटीस!

पुणे : पुण्यातील निसर्गरम्य पाषाण तलावात (Pashan Lake) मोठ्या प्रमाणावर मासे आणि जलचरांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. पुणे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे. केवळ निलंबनावरच न थांबता, मुख्य अभियंत्यालाही याप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेच्या या 'अ‍ॅक्शन मोड'मुळे संपूर्ण पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, पर्यावरण रक्षणाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



निलंबन झालेल्या 'त्या' चार अधिकाऱ्यांची नावे समोर

पाषाण तलावातील जलचरांच्या मृत्यूला जबाबदार धरत पुणे महापालिकेने मलनिस्सारण आणि क्षेत्रीय कार्यालयातील चार बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कट्स, तसेच औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विजय भोईर आणि विनायक चोपडे यांचा समावेश आहे. या चारही अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी घरी बसवण्यात आले आहे. तसेच, या विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांनाही प्रशासनाने नोटीस बजावत स्पष्टीकरण मागवले आहे.


विषारी सांडपाण्यामुळेच पाषाण तलावातील जलचरांचा अंत


पाषाण तलावात हजारो मासे अचानक का मरू लागले, या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तलावाजवळ १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय तपासात असा धक्कादायक खुलासा झाला आहे की, हा प्रकल्प केवळ कागदावर किंवा नावापुरता सुरू होता. प्रत्यक्षात, कोणतीही प्रक्रिया न करता मैलापाणी थेट तलावाच्या पात्रात सोडले जात होते. या विषारी सांडपाण्यामुळे तलावातील ऑक्सिजनच्या पातळीत मोठी घट झाली आणि जलचरांचा श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. या निष्काळजीपणामुळे केवळ पर्यावरणाची हानी झाली नाही, तर संपूर्ण परिसरातील सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे.

Comments
Add Comment

Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले.....

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराची जिद्द आणि मेहनत

Govt Job : २३ वर्षांची प्रतीक्षा संपली! महिला व बाल विकास विभागात ८,६६९ पदांची मेगाभरती; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागात तब्बल दोन दशकांनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या २३

Earthquake Parbhani and Nanded : मोठी बातमी: मराठवाडा हादरला! परभणी आणि नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे; पत्रे हलल्याने भीतीचे वातावरण

नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळी ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परभणी,

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर