नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने अटकेत असलेल्या सहा पैकी पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी आणि एचआर तसेच ऑपरेशन्स मॅनेजर अश्विनी चेनानीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. न्यायमूर्ती आर. सी. नरवाडिया यांनी हा निर्णय दिला. तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि असिफ अन्सारी या पाच जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चेनानीला पुण्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाची कसून पोलीस चौकशी चालली असून आरोपींच्या विरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या कुटुंबाच्या अडचणीत ...
नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली. यानंतर पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन केले. एका सॉफ्टवेअरशी संबंधित कामाचे निमित्त करून वेशांतर केलेल्या महिला पोलिसांची टीम कंपनीत आली होती. पूर्ण तयारी करून आलेल्या या पोलिसांनी कामाचे निमित्त करून एका मीटिंगची मागणी केली. या मीटिंगच्या वेळी आरोपींनी महिलांशी अश्लील चाळे आणि गैरवर्तन केल्याचे महिला पोलिसांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. सीसीटीव्ही फूटेज, कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती इतर ठोस पुरावे हाती येताच पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन माहिती दिली. यामुळे आतापर्यंत नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कंपनीत कामाच्या निमित्ताने अनेक कर्मचारी एकत्र बसत होते. यातील इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांचे सातत्याने ब्रेनवॉशिंग केले जात होते. कंपनीतले उच्चपदस्थ अधिकाराचा गैरवापर करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत होते. काही तरुणांनाही धर्मांतर करण्यासाठी ब्रेनवॉश सुरू असल्याचा अनुभव आला होता.
उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये (Yamuna River) पुलाला धडकून बुडाली. या अपघातात ...
आतापर्यंत दोन विवाहित महिलांसह एकूण आठ तरुणींनी लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या तक्रारी दिल्या आहेत, ज्यावरून ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून पीडितांवर त्यांच्या मूळ धर्माचा त्याग करून एका विशिष्ट धर्माची संस्कृती स्वीकारण्यासाठी सतत मानसिक दबाव टाकला जात होता. करिअरचे स्वप्न घेऊन आलेल्या तरुण तरुणींच्या हतबलतेचा फायदा घेत, त्यांच्यावर धार्मिक विचार लादण्याचे हे मोठे रॅकेट नाशिक पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास चक्रं फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी संबंधित कंपनीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा आपल्या ताब्यात घेतला आहे.