Inflation In US : इराण विरुद्ध पुकारलेल्या लढाईचा अमेरिकेतील सामान्यांना जबर फटका, महागाईत झाली एवढी वाढ

वॉशिंग्टन डीसी : इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे, इराणची अणुबॉम्ब तयार करण्याची आणि आण्विक हल्ला करण्याची क्षमता नष्ट करणे या प्रमुख हेतूने अमेरिकेने इराण विरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईला २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात झाली. आज १० एप्रिल उजाडला आहे. अद्याप अमेरिकेचा हेतू साध्य झाल्याचे दिसत नाही. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार अमेरिका इराण विरूद्धच्या युद्धात दर सेकंदाला दहा हजार ३०० डॉलर खर्च करत आहे. हा खर्च दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या युद्ध खर्चाचा भार अमेरिकेतील सामान्यांच्या जीवनावर पडत आहे. अमेरिकेतील सामान्यांना महागाईचा जबर फटका बसत आहे.


युद्धामुळे अमेरिकेतील सामान्यांच्या खिशावर थेट ताण पडू लागला आहे. गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्डवरील व्याजदरात वाढ झाली आहे. सध्या अमेरिकेत गृहकर्ज ६.३७ टक्के या दराने उपलब्ध आहे. युद्ध सुरू होण्याआधी अमेरिकेत ५.९८ टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध होते.



जेव्हा तेलाच्या किमती वाढू लागतात त्यावेळी अमेरिकेत महागाई वाढते. यूएस ट्रेझरी यील्ड वाढू लागते. अमेरिकेत गृहकर्जाचे दर आणि ट्रेझरी यील्ड यांचा थेट संबंध आहे. फेब्रुवारीत युद्ध सुरू होण्याआधी चार टक्क्यांपेक्षा कमी असलेले यूएस ट्रेझरी यील्ड आता ४.४८ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. अमेरिकेत वाहनकर्ज सात टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे ३० हजार डॉलरचे कर्ज घेणाऱ्याला दरमहा सुमारे ५९४ डॉलरचा हप्ता भरावा लागत आहे. महाग असलेल्या नव्या वाहनांसाठी वाढलेल्या वाहन कर्जांमुळे ग्राहक मिळणे कठीण झाले आहे.


सध्या अमेरिकेत क्रेडिट कार्डवरील सरासरी वार्षिक व्याजदर १९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत समान्य खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे युद्ध लांबत गेले तर किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी अधिकाधिक महाग होण्याचा धोका आहे.



युद्ध जितके जास्त काळ चालेल अमेरिकेत महागाई आणखी वाढेल. कर्जावरील व्याज आणखी वाढत जाईल. यामुळे कर्ज घेणे कठीण होईल. महागाई आणि कर्ज या दोन्हीत सातत्याने आणि वेगाने वाढ झाली तर अमेरिकेतील सामान्य नागरिक खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेऊ लागतील. यामुळे मंदीचा धोका वाढेल, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या