Big Boss Marathi 6 : 'तिच्या भावना खोट्या वाटतात', राखी सांवतबद्दल सागर कारंडे म्हणाला...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा चांगलाच गाजला असून आता बिग बॉस मराठीचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नुकताच घरातून सागर कारंडेची (sagar Karande) एक्झिट झाली. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात राकेश बापट, राखी सावंत , दीपाली सय्यद, अनुश्री माने, तन्वी कोलते, रेवा कौरासे आणि विशाल कोटियन हे सदस्य उरले आहेत.


बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा नवीन राडा रोजच पाहायला मिळतो. ती सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण लावण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर तिनं राकेशसोबत लव्ह अँगल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राकेशनं तिला मी तुला मैत्रीण मानतो, असं सांगितलं. अशातच आता सागर कारंडेनं एका मुलाखतीत राखी सावंतबद्दल भाष्य केलं आहे.


राखी सावंत, दीपालीला राकेशच्या नावानं डिवचत असते. दीपाली आणि राकेशमध्ये चांगली मैत्री असून राखीला त्यांची मैत्री खटकते. यावरून बिग बॉसच्या घरात असताना सागरनेही राखीला समजावलेलं.


आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सागर कारंडे म्हणाला की, 'राखीचं नातं हे गेमसाठी आहे. मला माहित आहे की, ती सगळं गेमसाठी करतेय. मला वाटतं की ते गेमसाठीच आहे. खऱ्या भावना असतील तर उत्तम आहे. ती रडली आहे, खूप वेळा भावूक झाली आहे. मला तेव्हा वाटलं होतं की, राकेशबद्दल तिच्या मनात भावना आहेत.' 'पण, का कोणास ठाऊक, त्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. लांडगा आला रे आला म्हणतो ना, की खरोखरचा लांडगा येईल, तेव्हा कोणी विश्वास ठेवणार नाही. राखीचं तसचं झालेलं आहे. खरंच ती भावूक झाली असावी. त्याच्याबरोबर ती जोडली गेली असावी. पण मला ते खोटं वाटतंय. ती गेमसाठी काहीही करू शकते, याची मला खात्री आहे. बिग बॉससाठी ती काहीही करू शकते.' असं सागरनं पुढे सांगितलं आहे.



दरम्यान, नुकताच बिग बॉस सीझन ६ मध्ये 'तिकीट टू फिनाले' चा टास्क तन्वी कोलतेनं जिंकला असून ती फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठीच्या सीझन ६ कोण जिंकणार ? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६