russia vs ukraine : रशिया आणि युक्रेन दरम्यान ३२ तासांची शस्त्रसंधी

मॉस्को : ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त रशियाने युक्रेनमध्ये ३२ तासांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर केला. शनिवारी दुपारी ४ वाजल्यापासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. हा निर्णय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या प्रस्तावानंतर आला असून, रशियाने आपल्या सैन्याला हल्ले रोखण्याचे आदेश दिले आहेत.


रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी पहाटे दोन दिवसांच्या कालावधीसाठी युद्धविरामाची घोषणा केली. “ऑर्थोडॉक्स इस्टरच्या येऊ घातलेल्या सणाच्या निमित्ताने, ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते १२ एप्रिल रोजी दिवसअखेरपर्यंत युद्धविराम जाहीर करण्यात येत आहे,” असे क्रेमलिनच्या घोषणेत म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रायलायने याबाबातची माहिती प्रसिद्ध केली आहे.


गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या माध्यमातून वाटाघाटी सुरु आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून यासाठी वाटाघाटी सुरु होत्या. पण, अमेरिका इराणबरोबर युद्धात अडकल्याने या चर्चांना लगाम लागला. मध्यपूर्वेतील संघर्ष शस्त्रसंधीमुळे थंडावला असताना रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामाला देखील महत्व प्राप्त झाले आहे. पुतिन यांनी ३२ तासांसाठी जाहीर केलेल्या युद्धविरामाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे. झेलेन्स्की यांनी ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला रशियाने सकारात्मक प्रतिसाद दिला. रशियाने युद्धविरामाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत, आणि युक्रेनकडूनही तशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. यापूर्वीही अनेकदा युद्धविराम करण्याचे प्रयत्न झाले आहेत, परंतु त्यांना मर्यादित यश मिळाले होते. दरम्यान, पुतिन यांनी गेल्यावर्षी देखील ३० तासांसाठी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्याचधर्तीवर यावर्षी देखील ऑर्थोडॉक्स इस्टरच्या निमित्ताने हा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांमध्ये ऑर्थोडॉक्स इस्टरचे मोठे महत्व आहे.

Comments
Add Comment

West Asia War : पश्चिम आशियातले युद्ध सुरूच राहणार ? शस्त्रसंधीची शक्यता मावळली ?

इस्लामाबाद : इस्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध २८ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम आशियात सुरू झाले. या

attack on Lebanon : ट्रम्पच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच

जेरुसलेम : इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्धविराम सुरू आहे आणि तो पुढे वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. दरम्यान,

Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

- अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्राणज्योत मालवली इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे

Iran-US-Israel War Ceasefire : अप्रत्यक्ष इराणला मदत करणारा पाकिस्तान शांतिदूत कसा ठरू शकतो ?

- पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर अमेरिकेचा प्रश्न पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थी केली होती.

US Drone : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला ?

होर्मुझ सामुद्रधुनी : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला की तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन समुद्रात

Israel - Pakistan Verbal Clash : आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ! पाकिस्तान - इस्रायलमध्ये शाब्दिक चकमक

- ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायल संतप्त इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने पाकिस्तानच्या (Israel - Pakistan Verbal Clash)