आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा
मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प नियोजनानुसार सुरू असून मे २०२७ पर्यंत मुंबईतील मुंबईतील सीसी रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.
महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार अमीत साटम यांनी मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामांविषयी माहिती दिली.
आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले की हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. पहिला टप्पा ३०७ किमीचा असून तो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला, तर दुसरा टप्पा ३७० किमीचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला.
कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आयआयटी ची थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या IIT दुसऱ्या टप्प्याचे ऑडिट करत असून आता पहिल्या टप्प्याचेही ऑडिट करणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
आर्थिक परिणामांबाबत बोलताना त्यांनी खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४–२५ मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३% घट झाली. २०२५–२६ मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३% घट झाली. चालू वर्षासाठी खड्डे दुरुस्तीचा निविदा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित आहे, म्हणजेच आणखी ५०% घट होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.






