Iran-US-Israel War : आण्विक युद्ध होणार? आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडे प्लेनच्या आकाशात घिरट्या

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा (Iran-US-Israel War) आजचा ३९ वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. अमेरिकेने ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करु शकतो आणि ही कारवाई आज रात्रीसुद्धा होऊ शकते. हे युद्ध सध्या अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जातंय आणि अमेरिकेकडे कमी वेळात मोठं नुकसान करण्याची शक्ती आहे, असंही ट्रम्प म्हणालेत. तर दुसरीकडे आण्विक युद्धासाठी (Nuclear War) वापरलं जाणारं डूम्सडे प्लेन आकाशात घिरट्या घेताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.


इराणला चार तासांत बेचिराख करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचं आण्विक युद्धासाठी वापरलं जाणारं विमान आकाशात 'डूम्सडे प्लेन' नावे ओळखल्या जाणाऱ्या विमानाच्या नेब्रास्का हवाईतळावर घिरट्या सुरू असल्याचं दिसून आलं आहे. हा तळ अमेरिकेच्या ओमाहा राज्यात आहे. अणू युद्धावेळी विशेष कमांड आणि कन्ट्रोलसाठी या विमानाचा वापर होतो. हे बोईंग कंपनीने तयार केलेलं ई-4 बी नाईटवॉच जातीचं विशेष विमान आहे.



इराणने उडवली अमेरिकेची खिल्ली :


संपूर्ण इराण (Iran-US-Israel War) देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो. आणि ती रात्र उद्याचीही असू शकते, अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर आता इराणने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या धमक्यांना आमच्या येथील लहान मुलंसुद्धा घाबरत नाहीत, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. आज रात्रीची प्रतिक्षा असल्याचं आव्हान देखील इराणकडून देण्यात आलं आहे.



किंग फहद कॉजवे पूल बंद :


तर दुसरीकडे इस्रायलने (Iran-US-Israel War) देखील मोठा इशारा दिला असून, सौदी अरेबिया आणि बहरीनला जोडणारा किंग फहद कॉजवे हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. इराणकडून संभाव्य हवाई हल्ल्यांच्या धमक्यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. वाढता तणाव लक्षात घेता पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल बहरीनसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो सौदी अरेबियाशी असलेला एकमेव रस्तामार्ग आहे.


Comments
Add Comment

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल

Gold mine collapses : खोदकामादरम्यान सोन्याची खाण कोसळली; 30 कामगारांचा मृत्यू, अनेक जण अडकले

बांगुई: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकामध्ये सोन्याची खाण कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. देशाच्या पश्चिम भागातील

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू