महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेतला. तसेच शाळेतील विविध प्रयोगशाळांनाही भेट दिली. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा , सांकेतिक भाषा , कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे कौतुक यावेळी आयुक्त भिडे यांनी केले. तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून आयुक्तांनी त्यांचीही कौतुकाने पाठ थोपटली.


मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा सोमवारी ६ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. राजावाडी (घाटकोपर) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज सीबीएसई शाळेत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. दादर (पश्चिम) येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुलाबपुष्प, पेन्सिल आणि चॉकलेट भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर गोवंडी येथील नटवर पारेख शाळेत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी भेट दिली.


दादर येथील शाळेत उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती ममता राव उपस्थित होते.तर, घाटकोपर येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) सायली सुर्वे आदींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजावाडी शाळेतील प्रवेशोत्सवावेळी लेझीम हाती घेऊन, लेझीम पथकामध्ये स्वतः सहभागी होत महापौरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर, महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, शैक्षणिक उपक्रम आदींची शिक्षक वृंदाकडून त्यांनी माहिती घेतली.


मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘गणित गुरुवार’ उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला. याबाबत उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी माहिती दिली. दादर येथील संगणकीय प्रयोगशाळेत अभ्यास करणाऱ्या अंश पाटील, नील बद्री, आरुष वंगारी (इयत्ता दहावी), अविघ्न शिंदे, श्रीराम चिकुला (इयत्त आठवी) या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना आकाशगंगा , सांकेतिक भाषा , कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत परिपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या गुणांचे आयुक्त भिडे यांनी कौतुक केले. तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य पाहून आयुक्तांनी त्यांची पाठ थोपटली.


राजावाडी (घाटकोपर) या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण ३६० विद्यार्थी आहेत. तसचे इयत्ता पहिली ते दहावीचे ७०० असे एकूण १०६० विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे शिक्षण घेत आहेत. तर दादर येथील भवानी शंकर मार्ग शाळेत पूर्व प्राथमिक वर्गाचे एकूण २७० विद्यार्थी आहेत. यासह महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १९ शाळा आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाच्या एकूण १४२ तुकड्या असून, यामध्ये ५ हजार ५७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच प्राथमिक शाळांच्या एकूण २७९ तुकड्या असून त्यात १० हजार ७८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे