Iran-US-Israel War : अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे (Iran-US-Israel War) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी)च्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी (Majid Khademi) यांचा मृत्यू झाला आहे.


आयआरजीसीने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवले आहे. मात्र, मेजर जनरल माजिद खादेमी यांची हत्या नेमकी कुठे झाली याबाबत आयआरजीसीने सविस्तर माहिती दिलेली नाही.


दरम्यान, सोमवारी (६ एप्रिल) पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या आसपासच्या निवासी भागांना लक्ष्य करून अनेक हवाई हल्ले करण्यात आले. एका न्यूज एजन्सीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या गार्ड्सच्या निवेदनानुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला.


माहितीनुसार, माजिद खादेमी यांनी जवळपास पाच दशकांपर्यंत इराणच्या गुप्तचर आणि सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुप्तचर आणि सुरक्षा क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणा आणि धैर्याने क्रांती, व्यवस्था आणि इस्लामी मातृभूमीसाठी सुमारे अर्धशतक महत्त्वपूर्ण, दीर्घकालीन आणि प्रेरणादायी योगदान दिले. आयआरजीसीने म्हटले आहे की, त्यांचे कार्य पुढील अनेक वर्षे देशाच्या गुप्तचर समुदायासाठी मार्गदर्शक ठरेल, विशेषतः धोरणात्मक स्तरावर परकीय शत्रूंना सामोरे जाण्यासाठी.


सोमवारी इस्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या सलग हल्ल्यांमध्ये २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय इराणनेही इस्रायल आणि त्याच्या शेजारील देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. रविवारी हायफा शहरावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.



४५ दिवसांचा युद्धविराम होणार ?


मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता युद्धविराम (सीजफायर) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामाचा (Iran-US-Israel War) एक आराखडा तयार झाला आहे. हा आराखडा लवकरच लागू होऊ शकतो, ज्यामुळे इराण होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा जहाज वाहतुकीसाठी खुली करू शकतो.


सूत्रांनी सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठीचा फ्रेमवर्क पाकिस्तानने तयार केला असून तो दोन्ही देशांना रातोरात पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात तात्काळ युद्धविरामानंतर सर्वसमावेशक करारासाठी दोन-स्तरीय (टू-लेयर) धोरणाची रूपरेषा देण्यात आली आहे.


एका सूत्राने सांगितले, “आज सर्व मुद्द्यांवर सहमती होणे अपेक्षित आहे. प्रारंभिक समज पाकिस्तानमार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अंतिम करण्यात आली असून आता त्याला सामंजस्य करार (एमओयू)चे स्वरूप दिले जाणार आहे.” या संपूर्ण चर्चाप्रक्रियेत पाकिस्तान एकमेव “संवाद माध्यम” (कम्युनिकेशन चॅनेल) म्हणून काम करत आहे.

Comments
Add Comment

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे