Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक रूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मरियम माता शोभायात्रा सुरू असताना संतोष नगर मार्केट परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंटजवळ किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. काही क्षणातच हा वाद तीव्र होत मारहाणीपर्यंत पोहोचला. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांकडून ढकलाढकली, मारहाण आणि गोंधळ उडाला.


या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, दिंडोशी पोलीस ठाणे येथील पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने हलका लाठीचार्ज करण्यात आला.


या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ८ जणांना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर