आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो सार्थकी लावला.
या सामन्यात मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला. त्याने अवघ्या ४ षटकांत केवळ ९ धावा देत २ बळी घेतले. त्याची इकॉनॉमी २.२० इतकी प्रभावी होती. या कामगिरीमुळे तो लखनऊसाठी ४ षटकांच्या स्पेलमध्ये सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला.
Shamifesting more wickets 🧿 pic.twitter.com/UwhVVxIM1b
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 5, 2026
☝️ Abhishek Sharma ☝️ Travis Head Vintage #MohammadShami! #SRH’s dangerous duo is gone, and #LSG are off to a great start! 🔥#TATAIPL 2026 | #SRHvLSG | LIVE NOW 👉 https://t.co/X6t7Rxs79d pic.twitter.com/CnjvNzYwqv
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2026
विशेष म्हणजे, शमी मागील हंगामात सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा भाग होता. २०२५ मध्ये त्याचा फॉर्म खराब राहिला होता. त्याने ९ सामन्यांत फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ट्रेडद्वारे एलएसजीमध्ये आणण्यात आले. मात्र, यंदा त्याने आपल्या जुन्याच संघाविरुद्ध शानदार कमबॅक करत सर्वांना प्रभावित केले.
दरम्यान, एलएसजीचे मालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. शमीची घातक गोलंदाजी पाहून त्यांनी तिरुपती बालाजींचा फोटो डोक्याला लावत आनंद व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.






