Middle East War : मध्य-पूर्व आशियातील युद्धामुळे युक्रेनवरील अमेरिकेचा वरदहस्त कमी होणार ?

 झेलेन्स्की यांना व्यक्त केली भीती


कीव : पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येत असून संपूर्ण जगात याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या युद्धामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की विशेषतः तणावाखाली आहेत. झेलेन्स्की यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चालल्यास युक्रेनला मिळणारा अमेरिकेचा पाठिंबा कमकुवत होऊ शकतो. त्यांनी सांगितले की वॉशिंग्टनच्या प्राधान्यक्रमात बदल झाल्यामुळे युक्रेनला अत्यंत आवश्यक असलेल्या पॅट्रियट एअर डिफेन्स क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यात घट होऊ शकते.


इस्तंबूलमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून दररोज होत असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनला अमेरिकेत तयार होणाऱ्या पॅट्रियट एअर डिफेन्स प्रणालीची अत्यंत गरज आहे. रशियाने चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आक्रमणानंतर अग्रिम मोर्च्यासोबतच शहरी भागांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले झाले असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पुरवठ्यालाही लक्ष्य केले आहे, ज्यामुळे ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत आणि हिवाळ्यात नागरिकांना हीटिंग व पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले.


झेलेन्स्की म्हणाले, “आपल्याला हे मान्य करावे लागेल की सध्या आम्ही प्राधान्यक्रमात नाही. त्यामुळे इराण युद्ध दीर्घकाळ चालल्यास आम्हाला मिळणारा पाठिंबा कमी होईल, अशी मला भीती वाटते.” मॉस्को आणि कीव यांच्या प्रतिनिधींमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली ताजी चर्चा फेब्रुवारीमध्ये कोणताही ठोस निष्कर्ष न निघता संपली. झेलेन्स्की यांनी रशियावर चर्चा लांबवण्याचा आरोप करत सांगितले की युक्रेन अजूनही संभाव्य करारासाठी अमेरिकन मध्यस्थांशी संपर्कात आहे आणि मजबूत सुरक्षा हमीची मागणी करत आहे. मात्र त्यांनी हेही मान्य केले की या चर्चांकडून जागतिक लक्ष काही प्रमाणात हटले आहे.


ते पुढे म्हणाले की त्यांची सर्वात मोठी चिंता पॅट्रियट प्रणालीबाबत आहे, कारण रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असून सध्या युक्रेनकडे त्याचा प्रभावी पर्याय नाही. झेलेन्स्की यांच्या मते, सुरुवातीपासूनच या प्रणालींचा पुरेसा पुरवठा झाला नाही आणि इराणमधील युद्ध लवकर संपले नाही तर परिस्थिती आणखी कठीण होईल.


झेलेन्स्की यांना आशा होती की युरोपीय देश पॅट्रियट प्रणाली खरेदी करण्यासाठी मदत करतील. मात्र आता सहाव्या आठवड्यात प्रवेश केलेल्या इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून पश्चिम आशियातील मोठा भाग त्याच्या प्रभावाखाली आला आहे. त्यामुळे मर्यादित संसाधनांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे, शस्त्रसाठे इतर दिशेकडे वळवले जात आहेत आणि युक्रेनमधील शहरे बॅलिस्टिक हल्ल्यांसाठी अधिक असुरक्षित बनत आहेत.युक्रेनच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा उद्देश मॉस्कोची अर्थव्यवस्था कमकुवत करणे आणि युद्ध महागडे बनवणे हा आहे. मात्र इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे रशियाचे उत्पन्न वाढत असून त्याची युद्धक्षमता मजबूत होत आहे. झेलेन्स्की म्हणाले की मध्यपूर्वेतील युद्धामुळे रशियाला आर्थिक फायदा होत आहे. त्यांनी रशियन तेलावरील अमेरिकन निर्बंधांमध्ये मर्यादित सवलत दिल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “रशियाला यामुळे अतिरिक्त पैसा मिळत आहे आणि त्याचा त्यांना फायदा होत आहे.”

Comments
Add Comment

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल

पश्चिम आशियात युद्ध तीव्र; इस्रायलचे इराण-लेबनॉनमध्ये मोठे हवाई हल्ले

जेरुसलेम : पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या इराणच्या युद्धाला पाच आठवड्यांहून अधिक काळ

US found Pilot: अमेरिकेने दुसऱ्या एफ-१५ई पायलटला काढले शोधून, इराणच्या गोळीबारातून केली सुटका

नवी दिल्ली: अमेरिकेने एका जमिनीवरील कारवाईत आपल्या दुसऱ्या वैमानिकाला वाचवले आहे. इराणने लष्करी कारवाईदरम्यान

Iran: इराणचे ट्रम्प यांच्या अल्टिमेटकडे दुर्लक्ष; इराणी लष्करी जनरल म्हणाले, "अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडले जातील"

नवी दिल्ली: इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या आत करार

Donald Trump: ट्रम्प आक्रमक, इराणला करून दिली ६ एप्रिलच्या अंतिम मुदतीची आठवण; '४८ तासांत इराणवर...'

नवी दिल्ली: इराणविरुद्धच्या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईला ३६ दिवस पूर्ण झाले आहेत . एक महिन्याहून

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.