Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले असले, तरी काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवत थेट आव्हान देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बारामतीसाठी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, यामुळे आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा अधिकृत सामना रंगणार आहे.


बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य गड मानला जातो. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Comments
Add Comment

गरिबांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना सोडणार नाही, प्रसंगी 'ईडी' कडे तपास देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

मुंबई: नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

भोंदूबाबा अशोक खरातने हवालाद्वारे पाच देशांत पाठवले हजारो कोटी?, रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिक

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत

Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून बारामती विधानसभा मतदारसंघाची

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे