रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ही मशीन कॉम्पॅक्ट असून नाल्याच्या बाहेरुन ऑपरेट केली जावू शकते आणि नाल्यातील माती, दगड तसेच लाकूड यासारख्या मोठ्याप्रमाणात कचरा याद्वारे बाहेर काढता येवू शकतो.


मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरीता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे याची सफाई करण्यासाठी विविध प्रकारची वाहनरुद्ध मशीन्स आहेत. ज्यांचा वापर शहरातील ९ आणि १५ उपनगरीय वॉर्डामध्ये मॅनहोल, पाण्याचे प्रवेशद्वार साफ करण्यासाठी तथा गाळ काढण्यासाठी केला जात आहे.


परंतु मुंबई शहर व उपनगरामध्ये रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट्स आहेत. अशा रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्टची साफसफाई तथा गाळ काढण्यासाठी विशेष यंत्रसामग्रीची आवश्यकता होती. या रस्ते आणि रेल्वे ट्रॅकच्या खाली कल्व्हर्ट बंदिस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा तिथे साचतो. पण या विभागाकडे उपलब्ध असलेल्या वाहनांवर बसवलेल्या वाहनरुढ मशिन्सच्या सहाय्याने तेथील गाळ काढणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनी विभागाने सन २०१९ मध्ये रिमोट कंट्रोल्ड स्विंग लोडर मशीन खरेदी केली होती आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचेकाम कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र, याबाबतचे कंत्राट संपुष्टाता आल्याने आता नव्याने देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी ही महापालिका प्रशासनाला या २४ मशिन्सच्या देखभालीसाठी नव्याने तीन वर्षांकरता नेमणूक करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या साठी तीन वर्षांकरता सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. यासाठी एच ई सी एन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची