सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे?
मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा कुंडयांचे संख्या कमी केली जात असतानाच आता महापालिका प्रशासन तब्बल १३ हजार ५०० कचरा कुंड्यांची खरेदी करणार आहे. त्यामुळे या मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्यांचा वापर नक्की कुठे होणार आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.






