Pune News : ७ वर्षीय चिमुरडीला खोलीत बोलावून...नराधमाचा 'तो' संतापजनक प्रकार पाहून आई अन् आत्याला...

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) मोशी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिमुरडीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



खिडकीतून दिसला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार...


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, "हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारीन," अशी धमकी देऊन त्याने चिमुरडीची वाचा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या नराधमाची विकृती एवढ्यावरच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नशिबाने, याच वेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष पाहिला. घरच्यांनी तात्काळ सतर्कता दाखवल्यामुळे या नराधमाचे कुकृत्य उघड झाले. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



नराधमावर पोक्सोसह 'बीएनएस'चे कठोर कलमे


हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या कुटुंबीयांनी विलंब न लावता एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या नराधमाविरुद्ध कायद्याचा बश बसवणारी कठोर कलमे लावली आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अमानवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, "अशा नराधमांना समाजात स्थान नसावे, त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी पावले उचलली जात आहेत.

Comments
Add Comment

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.