जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

जळगाव : एकीकडे आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे सोने-चांदीचे दर घसरले आहेत.जळगावच्या सुवर्णबाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा २५७५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात ६१८० रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत घसरलेआखाती देशांमधील या युद्धांमुळे सोन्याचे दर आतापर्यंत १२४८९ रुपयांची घसरण झाली आहे. तर युद्धाच्या कालावधी चांदीचे दर ४०,००० रुपयांनी घसरले आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर तणाव असला तरीही सोने-चांदीची मागणी वाढताना दिसत आहे. ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने अनेक लोक सोने-चांदी खऱेदी करताना दिसत आहेत.
Comments
Add Comment

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा झालेले फोन कॉल ?

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा फोन कॉल झाल्याचा

अमित ठाकरेंकडे पुणे, यशवंत किल्लेदारांकडे कोल्हापूर

मनसेकडूनही जिल्हा संपर्क अध्यक्षांची घोषणा मुंबई : शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्हावार

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या' पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून,

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती १०९ डॉलरच्या पुढे

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार होत आहेत.