मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताने मुंबई गोवा महामार्गवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ८ ते ९ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अपघात इतका गंभीर होता की बस पूर्णपणे उलटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. जखमींना तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बस सुकळी खिंडीतून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.


दरम्यान, बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, चालकाचा वेग किंवा निष्काळजीपणा कारणीभूत होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात PSI गोपाळ बदनेला जामीन

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात

गुड फ्रायडे निमित्त आज शेअर बाजार बंद; सोमवारी पुन्हा व्यवहार होतील सुरू

नवी दिल्ली : गुड फ्रायडे निमित्त आज देशांतर्गत शेअर बाजार बंद आहे. साप्ताहिक सुट्टीमुळे या शनिवार आणि रविवारीही

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करा, भारताची मागणी

ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मत नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या

पूर्व काँगोमध्ये आयएसआयएसशी संबंधित बंडखोरांनी केला मोठा हल्ला; ४३ जण ठार

नवी दिल्ली: इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाशी संलग्न असलेल्या बंडखोरांनी पूर्व काँगोमध्ये एक मोठा हल्ला केला