Chahaava 2 : आता 'या' नव्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल, 'छावा 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?

मुंबई : बॉलिवूडमध्ये गाजलेला आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा २०२५ मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित असणारा छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विक्की कौशल स्टारर 'छावा' सिनेमा आपल्या धमाकेदार यशानंतर पुन्हा एकदा ही जोडी इतिहास घडवण्यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे.


छावा सिनेमानं प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर तब्बल ८०७ कोटींची दमदार कमाई केली. या विक्रमी यशानंतर आता छावा सिनेमाचे निर्माते लवकरच छावा २ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा साम्राज्यातील आणखी एका महान व्यक्तिमत्त्वाची कथा या पुढील भागात दाखवली जाणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie)चा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असून 'छावा'मध्ये संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली होती, तर या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये त्यांचे सुपुत्र 'शाहू महाराज' यांच्या जीवनावर आणि त्यांच्या संघर्षांवर आधारित कथा मांडली जाणार असल्याची माहिती आहे.


विक्की कौशलनं या कथेबद्दल विशेष रस दाखवला असून तो पुन्हा एकदा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे. सध्या हा प्रोजेक्ट सुरुवातीच्या टप्प्यात असून सर्व काही सुरळीत झालं, तर पुढच्या वर्षी किंवा २०२८ च्या सुरुवातीला या सिनेमाचं शुटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.


या नव्या सिनेमाची चर्चा सुरु असली तरी विक्की आणि लक्ष्मण उतेकर सध्या त्यांच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लक्ष्मण उतेकर सध्या 'ईथा' या सिनेमाच्या दिग्दर्शनात गुंतले असून त्यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा पूर्ण केल्यानंतरच ते शाहू महाराजांच्या कथेची तयारी सुरु करणार आहेत.





तर विक्की कौशलही खूप व्यस्त असून सध्या विक्की संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' या सिनेमाचं शूटिंग करत असून त्यानंतर भगवान परशुरामांवर आधारित 'महावतार' या मोठ्या प्रोजेक्टसाठी तयारी करणार आहेत. पण, या नव्या सिनेमाबाबत विक्की कौशल किंवा लक्ष्मण उतेकर यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, छावा सिनेमाच्या ऐतिहासिक अनुभवानंतर आता छावा २ पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत