KitKat theft : १२ टन किटकॅट चॉकलेटने भरलेला ट्रक गेला चोरीला; अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांनी व्यक्त केला शोकसंदेश

मुंबई : मौल्यवान गोष्टी चोरीला गेल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो, आणि त्या घटना गंभीरही असतात. पण नुकतीच किटकॅट हे सर्वांचं आवडत चॉकोलेट चोरीला ला गेल्याची घटना घडली आहे. इंग्लंडहून पोलंडला जाणार ट्रक ह्यात ४, १३, ७९३ किटकॅट चॉकलेट्स भरलेले होते. आणि हाच ट्रक चोरांनी लंपास केला आहे. चोरलेल्या ट्रकमध्ये असलेली चॉकलेटस ही एफ १ आणि किटकॅट यांच्या भागीदारीतून बनवलेली खास कारच्या अनेक वेगवेगळ्या गाड्यांचा आकाराची होती.


सुमारे १२ टन वजनाचा ४ लाखांहून अधिक किंमतीचा किटकॅट बारने भरलेला ट्रक गायब झाल्याने लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. किटकॅटची चोरी कोणी का आणि कशी केली यावरून चर्चेला उधाण आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ही चॉकलेट्स एका ट्रकमधून इटलीहून पोलंडला ईस्टरनिमित्त जात होती. परंतु वाटेतच तो ट्रक गायब झाला असून हि सुनियोजित आणि विचारपूर्वक केलेली घटना होती. ज्यामुळे इटलीतील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहे. कंपनीने प्रतिक्रिया देत या प्रकारच्या घटनेत वाढ होत चालल्याचे सांगितले आहे.



मिम्स आणि प्रक्रियांचा पाऊस


या घटनेवरून अनेक जणांना काय आणि कस व्यक्त व्हावं हेच कळत नाही आहे. बातमी पसरताच इंटरनेटवर मीम्सचा पूर आला. लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. कोणीतरी लिहिले, "ज्याने कोणी इतके किटकॅट्स चोरले आहेत, त्याला आयुष्यभर विश्रांती घ्यावी लागेल." काही वापरकर्त्यांनी तर फिल्मी अंदाजात याला "चॉकलेटची मोठी चोरी" असेही म्हटले. या विलक्षण चोरीमुळे लोकांना हसायला कारण मिळाले. असे म्हटले जात आहे की, चोरी झालेले किटकॅट बार सामान्य नव्हते, तर एका विशेष आवृत्तीचा भाग होते. ते फॉर्म्युला वन कलेक्शनचा भाग म्हणून लॉन्च करण्यात आले होते, ज्यामध्ये चॉकलेट्सना लहान रेस कारचा आकार देण्यात आला होता. यामुळेच त्यांचे मूल्य अधिक असल्याचे मानले जात आहे. शिवाय मोठ्या कंपन्यांनी देखील खालील विनोदीपद्धतीने निवेदन जरी करत शोकसंदेश व्यक्त केला आहे.


 



 


डोरडॅश


अमेरिकन डिलिव्हरी ॲप डोरडॅशनेही अशीच भूमिका घेतली आणि आणखी एक (अन)अधिकृत निवेदन जारी केले, ज्यात म्हटले आहे: “नमस्कार मित्रांनो, आम्ही डोरडॅश बोलत आहोत. पॅकेजिंगमधील एका पूर्णपणे अनपेक्षित चुकीमुळे, आमच्या डॅशमार्ट्समध्ये १२ टन किटकॅट्स पडून आहेत, जे आम्ही विकू शकत नाही. चांगली बातमी अशी की: तुम्हाला फक्त तुमच्या डोरडॅश ॲपवर जाऊन तुमच्या कार्टमध्ये सुमारे ५००-६०० किटकॅट्स टाकायचे आहेत आणि ही समस्या लवकरच सुटेल. धन्यवाद.”



 मॅकॅफी


यांनी लिहिले, “१२ टन चॉकलेटचे नुकसान झालेल्या किटकॅटसोबत आमच्या सहानुभूती आहेत. ते चॉकलेट कुठे गेले हे कदाचित आम्हाला माहीत नसेल, पण आम्हाला हे नक्की माहीत आहे: ग्राहकांचे संरक्षण करण्यापासून आम्ही कधीही 'विश्रांती' घेत नाही.”


Comments
Add Comment

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह