Disha Vakani : 'या' कारणामुळे तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये कमबॅक करणार नाही दयाबेन? मिसेस सोडीनं केला मोठा खुलासा

मुंबई : घराघरात मोठ्या उत्सुकतेनं पाहिली जाणारी लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मिसेस सोडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनं नुकताच या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानीबद्दल एक खुलासा केला आहे.


जेनिफर मिस्त्रीनं तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत १५ वर्ष काम केल्यानंतर २०२३ मध्ये या मालिकेतून एक्झिट घेतली. नुकताच जेनिफरनं एका मुलाखतीत बोलताना दयाबेनबद्दल सांगितलं की 'ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, लोकांना कसं गुंतवून ठेवायचं उत्सुकता कशी निर्माण करायची. जेव्हा मी शोमध्ये होते, तेव्हा एक मुलगी होती, ते तिचे ऑडिशन घ्यायचे. ती दिल्लीहून यायची. 'आम्ही करू, आम्ही करू' असे म्हणत त्यांनी तिला दयाच्या भूमिकेसाठी दोन वर्षे अडकवून ठेवलं होतं. आम्ही तिच्यासोबत एक मॉक शूटसुद्धा केलं होतं. ती शंभर टक्के दयाच आहे. तिचा चेहरा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय, ती दया नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. पण ती २७-२८ वर्षांची होती, त्यामुळे अडचण झाली. ती दिलीपजींसमोर खूपच लहान दिसत होती. म्हणूनच त्यांनी तिला शोमध्ये घेतलं नाही.' जेनिफर मिस्त्री याबद्दल बोलताना म्हणाल्या, "दिशा आता शोमध्ये परत येत नसली तरी, ती पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. ही २०२१ ची गोष्ट आहे. दिशा वकानीचं दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू होणार होतं. तिनं ड्रेस घालून पाहिला आणि ती निघून गेली, पण अचानक सर्व काही बदलले आणि दिशा आलीच नाही."


जेनिफर पुढे म्हणाली, "दिशा आता शोमध्ये दिसणार नाही. तिची मार्केटिंग स्ट्रॅटेजी फोटो पोस्टिंगच्या माध्यमातून सुरू राहील." जेनिफरनं पुढे सांगितलं की, दिशा वकानीच्या सासरच्या मंडळींच्या काही मर्यादा होत्या. दिशानं रात्री उशिरा किंवा जास्त वेळ शूटिंग करावं, असं त्यांना वाटत नव्हतं. मात्र, निर्मात्यांनी हे मान्य करण्यास नकार दिला.


जेनिफर म्हणाली, 'तिनं आणि सोनालिका जोशीनं असित मोदींना सांगितलं होतं की त्या दिशा वकानीच्या घरी जाऊन शूटिंग करू शकतात, पण ते सहमत झाले नाहीत.' अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही ऐकल्याप्रमाणे, तिच्या कुटुंबीयांचा काही आक्षेप होता, जसं की ती रात्री उशिरा शूटिंग करणार नाही, रात्री शूटिंग करणार नाही, जास्त वेळ शूटिंग करणार नाही, त्यामुळे थोडेफार करता आले असते, पण आम्ही तेवढे तरी कसे करू शकलो असतो.' असं म्हणतं या मुलाखतीत बोलताना जेनिफरनं तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानीच्या न परतण्याबद्दलचं कारणं सांगितलं आहे.

Comments
Add Comment

Arbaz Patel : अरबाज आणि निक्की विवाहबंधनात अडकणार ? काय म्हणाला अरबाज ?

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे

Raja Shivaji : अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, 'राजा शिवाजी' सिनेमाचा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा ( Riteish Deshmukh ) बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमा राजा

Shahrukh Khan's King Movie : आखाती देशातील युद्धाचा बॉलीवुडलाही फटका; शाहरुखच्या 'किंग'मधील ॲक्शन सीक्वेन्समध्ये बदल

- दुबईऐवजी मुंबईत होणार चित्रीकरण मुंबई : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे.

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंदर २ चं' वादळ! KGF २ च्या विक्रमांना लोळवत ९०० कोटींच्या उंबरठ्यावर!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच