Arbaz Patel : अरबाज आणि निक्की विवाहबंधनात अडकणार ? काय म्हणाला अरबाज ?

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे चर्चेतही असतात. या रिअॅलिटी शोमधील भाडणं, वादविवाद, याबरोबरच अनेकांच्या जोड्याही जुळतात. मात्र, शो संपल्यानंतर यांपैकी काही जोड्या कायम एकत्र राहतात तर काही जोड्या तुटतात. अशीच एक सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अरबाज पटेल (Arbaz patel) आणि निक्की तांबोळी (nikki tamboli) ही आहे.


निक्की आणि अरबाज ही जोडी बिग बॉस मराठीच्या मागील पर्वात सहभागी झालेली. त्यावेळी बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोनंतर दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. तर हे कपल सोशल मीडियावरही एकमोकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. ही जोडी नुकताच पुन्हा एकदा 'द 50' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झालेली या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली.


बिग बॉसच्या घरातून सुरू झालेलं यांचं नातं अजूनही टिकून आहे, त्यांच्या जोडीवर चाहतेही सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता दोघांना अनेकवेळा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला जातो.


नुकताच द 50 रिअॅलिटी शोचा फिनाले पार पडला असून या शोचा विजेता शिव ठाकरे ठरला आहे. या शोनंतर एका मुलाखतीत बोलत असताना अरबाजने शोमधील वाद, राडा यासोबतच त्याच्या आणि निक्कीच्या नात्याबद्दलही गप्पा मारल्या. यादरम्यान दोघेही लग्न कधी करणार? या प्रश्नाचंही उत्तर अरबाजनं दिलं आहे.


दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की आमच्याबद्दल तुम्ही एवढा चांगला विचार करताय, हे ऐकून खूप आनंद होतोय, लवकरच एक चांगला मुहूर्त काढू, जो चांगला मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर लग्न करू, पण सध्या ही काम करण्याची आणि यश मिळवण्याची वेळ आहे. हे वय आणि ही वेळ पैसे कमावण्याचं आणि जीवनात पुढे जाण्याचं आहे. तर जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील, तेवढ्या लवकर आम्ही लग्न करू असं अरबाज दोघांच्या लग्नाबाबत म्हणाला आहे.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये