राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विभागांतील पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.


यामध्ये विशेष लक्षवेधी बदल म्हणजे अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती. त्या यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या जागी १९९३ बॅचचे वरिष्ठ अधिकारी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा यापूर्वी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.


मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि हिवाळी अधिवेशनामुळे प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. मात्र मार्च अखेरीस या बदल्या अपेक्षित होत्या. त्यानुसार २८ मार्च रोजी काही बदल्या झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर फेरबदल जाहीर करण्यात आले.



प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :-


लोकेश चंद्रा (आयएएस १९९३ ) — मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई


अश्विनी भिडे (आयएएस १९९५ ) — आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका


विकास चंद्र रस्तोगी (आयएएस १९९५ ) — अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग


विनिता वैद सिंघल (आयएएस १९९६ ) — प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग


परिमल सिंग (आयएएस २००४ ) — सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग


तुकाराम मुंढे (आयएएस २००५ ) — सचिव, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभाग


लहू माळी (आयएएस २००९ ) — व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड


माणिक गुरसाल (आयएएस S २००९ ) — सचिव, दिव्यांग कल्याण विभाग


प्रेरणा देशभ्रतार (आयएएस २०१०) — आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग


पृथ्वीराज बी. पी. (आयएएस २०१४ ) — आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका


या बदल्यांमुळे राज्यातील विविध विभागांमध्ये नवे नेतृत्व निर्माण होणार असून, प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील

अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते

'Dunagiri' Warship : स्वदेशी ‘स्टेल्थ फ्रिगेट’ तंत्रज्ञानाने बांधणी केलेली ‘दुनागिरी’ युध्दनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालना मुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड

मुंबईत वीज दरात कपात; एप्रिल २०२६ पासून ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पावर आणि अदानी

नवीन आयकर कायदा आणि अनेक अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून होणार लागू

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार

Navnath Ban : मतदारांनी नाकारल्यामुळे संजय राऊत, उबाठा गट नामर्द बनल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या