Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका गॅरेजमध्ये लपून बसलेल्या विषारी नागाने परिसरात दहशत निर्माण केली असून, या नागाच्या दंशामुळे तीन भटक्या कुत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गांधारी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.



नेमकी घटना काय?


">मिळालेल्या माहितीनुसार, गांधारी परिसरातील एका गॅरेजमध्ये हा नाग गेल्या अनेक दिवसांपासून लपून होता. परिसरात वावरणाऱ्या तीन भटक्या कुत्र्यांवर या नागाने अचानक हल्ला चढवला. नागाने केलेल्या विषारी दंशामुळे या तिन्ही कुत्र्यांची प्रकृती खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक अशा तीन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांच्या लक्षात आले की परिसरात एखादा विषारी साप वावरत आहे. परिसरात नाग असल्याची खात्री पटताच स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण केले. दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने त्या नागाला पकडले. हा नाग प्रचंड विषारी असल्याची माहिती समोर आली आहे. नागाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पकडलेल्या नागाला सुरक्षितरीत्या वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



प्रशासनाचे आणि सर्पमित्रांचे आवाहन


या घटनेमुळे गांधारी परिसरात भीतीचे सावट अजूनही कायम आहे. पावसाळा आणि वाढलेले गवत यामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, भंगार किंवा गॅरेज सारख्या ठिकाणी अंधारात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच साप आढळल्यास त्याला मारू नका, तर तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Tags
Kalyan Newsgandhari area
Comments
Add Comment

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे

Leander Paes : प्रख्यात टेनिसपटू लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भारतीय टेनिस दिग्गज लिअँडर पेसने (Leander Paes) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव